Satara 
सातारा

वाळूचे लिलाव नसताना बांधकामे तेजीत कशी? तलाठ्यांचे हात ओले होत असल्याची चर्चा

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : परिसरातील कुकुडवाड आणि वरकुटे-मलवडी या महसूल मंडलांतील अनेक गावांतील ओढ्यांतून रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणावर वाळूचा बेकायदा उपसा राजरोसपणे सुरू असून, त्यातून शासनाचा दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे. मात्र, महसूल, पोलिस विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसत आहे. वाळूचे कुठेही शासकीय लिलाव नसताना बांधकाम व्यवसाय तेजीत कसा, असा प्रश्‍न सर्वांना पडलेला आहे. 

कुकुडवाड आणि वरकुटे-मलवडी महसूल मंडलातील गावांतून ट्रॅक्‍टरद्वारे वाळूचा उपसा सुरू असताना या वाळू तस्करांना स्थानिक गावकामगार तलाठ्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. नाही तर वाळूउपसा कसा काय होऊ शकतो? विशेष म्हणजे महसूल विभागामधील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही तस्कारांकडून रसद पुरविली जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही वाळूतस्कर तर मोठ्यामोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून महसूलच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असून, अशा वाळूतस्करांची नावे उघड करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. 

परिसरात वाळू तस्करांची आपापसांत भांडणेदेखील होतात. गावागावांचे सुज्ञ नागरिक या रात्रंदिवस चालणाऱ्या वाळू तस्करीकडे उघड्या डोळ्यांनी पाहत असून, रात्रीच्या होणाऱ्या वाळू उपशामुळे नागरिकांची झोपमोड होत असून अधिकाऱ्यांनी सुस्ती सोडून आणि वाळू तस्करांना पकडण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. 

वाळूबंदी असताना परिसरामध्ये मोठमोठ्या इमारतींची बांधकामे सुरू असून, ही बांधकामे चोरट्या वाळूच्या भरवशावर चालतात तर काही वाळूतस्करांनी अनेक ठिकाणी वाळूचा साठा करून ठेवला असून, त्याची चढ्या दराने विक्री सुरू आहे. ही चोरटी वाळू असल्याने एक ट्रॅक्‍टर वाळूला तीन ते साडेतीन हजार रुपये मोजावे लागतात. यामुळे वाळू विकत घेणारे कंगाल आणि अवैध उपसा करणारे मालामाल होत असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाचे लाखो रुपयांचे गौणखनिज लुटून नेले जाताना महसूल विभाग गप्प का? असाही सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. महसूल खाते याची दखल घेणार का नाही, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. 


महसूल प्रशासनाच्या डोळ्यासमोरून तस्करी! 

कुकुडवाड, वरकुटे-मलवडी, पाणवन, विरळी, काळचौंडी परिसरात सध्या महसूल, पोलिसांच्या उघड्या डोळ्यासमोरून वाळूने भरलेली वाहने दिवस-रात्र ये-जा करताना दिसून येत आहेत. मात्र, ते काही करत नाहीत. तसेच महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती या वाळूतस्करांना अगोदरच कशी काय मिळते ? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचा हिचा भीषण अपघात, ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत आणलं, Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT