आत्महत्या sakal
सातारा

कोरेगाव : पत्नीवर हल्ला करून पतीची आत्महत्या

वाठार स्टेशनमधील प्रकारामुळे परिसरात खळबळ

सकाळ वृत्तसेवा

वाठार स्टेशन : वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला करून पतीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. आज पहाटे झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय राजेंद्र ऊर्फ राजाराम भिसे (वय ३५, रा. रविवार पेठ, वाई) व पूजा अजय भिसे (वय २५) यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता. २९ सप्टेंबरला रात्री अजय व त्याची पत्नी पूजा यांच्यामध्ये भांडण झाल्याने पूजा ही गुरुवारी पुणे येथे निघून गेली. त्यानंतर माहेरी वाठार स्टेशन येथे वडिलांना भांडण झाल्याचे सांगितल्यावर पूजाची बहीण सुजाता घोलप व तिची आई रंजना दोरके या दोघी पूजाला वाठार स्टेशन येथे आणण्यासाठी पुणे येथे गेल्या. पुणे येथून काल साडेचार वाजता वाठार स्टेशन येथे आल्या.

पती अजय भिसे याला आपली पत्नी वाठार येथे माहेरी आल्याचे समजल्यानंतर तो काल रात्री एक वाजता सासरी वाठार स्टेशन येथे आला. दरम्यानच्या काळात कौटुंबिक वादाविषयी चर्चा होत असताना पहाटे पाचच्या सुमारास अजयने किचनमध्ये असलेली कुऱ्हाड हातात घेऊन कॉटवर झोपलेल्या पत्नीच्या तोंडावर व पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. त्यानंतर तिथून पलायन करून पहाटे सहा वाजता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या खाली आत्महत्या केली.

पूजा हिला सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला भाजपच्या मंत्री आमदारांचाच विरोध, ग्रामीण भागात रोष वाढला; स्मार्ट मीटर बसवणे बंद होणार? ऊर्जा मंत्रीचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT