Satara 
सातारा

पाचगणीतील टेबललॅंडची वाट बिकट!

सुनील कांबळे

भिलार (जि. सातारा) : पाचगणी शहरातील पर्यटनस्थळांकडे जाणारे पायरस्ते झुडपांनी अतिक्रमित केले असल्यामुळे पर्यटकांना तसेच पादचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांवरील झुडपे पालिकेने हटवून रस्ता निर्धोक करावा, अशी मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 

सध्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने सर्व पर्यटनस्थळे लॉक केली आहेत. तरीसुद्धा जिल्हाबंदी उठल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळांवर येत आहेत. पर्यटनस्थळांवर प्रतिबंध असला तरी या स्थळांशेजारी जावून पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. टेबललॅंडचे पठार हे पर्यटकांचे आकर्षण आहे आणि पाचगणी हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. या स्थळावर नाक्‍यापासून जाण्यासाठी नागमोडी वळणाचा रस्ता आहे. परंतु, पायी जाणाऱ्या पर्यटक व नागरिकांसाठी सेंट कॉन्व्हेंन्ट स्कूलच्या जुन्या गेटपासून चढणीच्या पायऱ्या आहेत. या दगडी पायऱ्या आजूबाजूच्या झुडुपांनी अतिक्रमित केल्या आहेत. ही काटेरी झुडपे येणाऱ्या जाणाऱ्या पादचारी व पर्यटकांना अडथळा निर्माण करीत आहेत. ही झुडपे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना ओरबडत आहेत. त्यामुळे ही झुडपे तातडीने पालिकेने काढून पायऱ्यांचा रस्ता निर्धोक करावा, अशी मागणी येथील पर्यटक व नागरिकांनी केली आहे. 

सध्या पाचगणीत पर्यटक येत असून, टेबललॅंड पर्यटकांसाठी बंद असल्याने पर्यटक पायी जात असल्यामुळे हे पायी जाणारे रस्ते पालिकेने झुडपांतून मुक्त करावेत, अशी मागणी राजू काकडे यांनी केली आहे. टेबललॅंडच्या कुशीत गोडवली हे ऐतिहासिक गाव वसले असून, या गावाला पाचगणीहून पायी जाण्यासाठी टेबललॅंडवरून जावे लागते. हा रस्ता सध्या झाडे, झुडपे, गवताने माखला असल्याने चालणेही मुश्‍किलीचे होत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केली आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT