Satara 
सातारा

मंडप न उभारता मंदिरांतच "श्रीं'ची प्रतिष्ठापना, जावळीत 100 गावांत "एक गणपती'

महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात जवळपास शंभर गावांत "एक गाव, एक गणपती' उपक्रम राबवण्यात आला आहे. तालुक्‍यामध्ये 175 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी "श्रीं'ची प्रतिष्ठापना केली आहे. गेल्या वर्षी 178 मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली होती, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी दिली. 

तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या सर्व मंडळांनी नियम पाळून गणेशोत्सवात सहभाग घेतला आहे. 
कोरोनामुळे या वर्षी सर्वांनीच आपल्या उत्साहाला आवर घातला आहे. अनेक मंडळांनी कोरोनाबाबत जनजागृती करणारे देखावे उभे केले आहेत, तसेच रक्तदान, सॅनिटायझर व मास्क वाटप यासारखे सामाजिक उपक्रम राबवले आहेत. प्रशासनाच्या आवाहनाप्रमाणे सर्व मंडळांच्या श्री गणेशाच्या मूर्ती चार फुटांपेक्षा लहान आहेत. तालुक्‍यातील अनेक मंडळांच्या कायमस्वरूपी मूर्ती असून, "श्रीं'ची मंदिरे आहेत. दर वर्षी गणेशोत्वातील विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी ही मंडळे मोठ्या मंडपात "श्रीं'ना मिरवणुकीने आणून विराजमान करतात; परंतु यावर्षी या मंडळांनी मंदिरातच "श्रीं'ना प्रतिष्ठापित करून मंदिराला विद्युतरोषणाई व फुलांची सजावट केली आहे. 

तालुक्‍यातील युवकांनी दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा आहे. हाच संयम श्री गणपती विसर्जनापर्यंत कायम ठेवावा, असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले आहे. आपल्या बेजबाबदारपणामुळे आपण स्वतः, आपले कुटुंब व समाज अडचणीत येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. श्रद्धा व भक्तिभावाने हा उत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

SCROLL FOR NEXT