karad 
सातारा

या तालुक्‍यात बेजबाबदारपणा आला अंगलट

महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) ः जिल्ह्याच्या शुक्रवारच्या (ता. 17) अहवालात पुनवडी येथील 13 व सायगाव येथील 4 अशा एकूण 17 जणांचा, तर शनिवारच्या (ता. 18) अहवालात पुनवडीतील 18 व सायगावमधील एक अशा 19 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधित गावात कुडाळ नजीकच्या आलेवाडी या गावाचा नव्याने समावेश झाला असून, तेथील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे. 

जावळी तालुक्‍यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा 330 वर पोचला आहे. आतापर्यंत तालुक्‍यातील 12 जणांचा कोरोनाने बळी घेतला असून, 142 जण बरे होऊन घरी परतले आहेत. 176 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यापैकी पुनवडीत कोरोना बाधितांचा आकडा 158 वर पोचला असून, या गावातील दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. प्रशासनाचे नियम न पाळण्याने व बेजबाबदारपणातून केवढी मोठी किंमत चुकवावी लागते, याचे पुनवडी व रामवाडीतील वाढलेला संसर्ग हे उदाहरण आहे. एका ठिकाणी विवाह सोहळा व दुसरीकडे अंत्यविधी या दोन सार्वजनिक कार्यक्रमांमुळे दोन्ही गावांवर मोठे संकट ओढवले होते. आपल्यामुळे आपल्या स्वतःला, कुटुंबाला व समाजाला अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT