उमरकांचन (खालचे आवाड) : घरे मोडून माहुली (सांगली) येथे साहित्य हलविण्याची रविवारी सुरू असलेली लगबग.  
सातारा

...पुन्हा जलसमाधी मिळण्यापूर्वीच मोडले निवारे

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी,  (जि. सातारा) : मराठवाडी धरणात दहा वर्षांपासून पाणी अडविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील घळभरणीनंतर धरणात 0.60 टीएमसी पाणीसाठा होत होता. मात्र, गेल्या वर्षी सांडव्याचे बांधकाम सुरू केल्याने तो वाढून 1.05 झाल्याने अनेक मंदिरे, घरे, पाणी पुरवठ्याच्या विहिरी, स्मशानभूमी पाण्यात गेल्या होत्या.

उमरकांचन येथील खालचे आवाडातील अनेक घरे पाण्यात बुडाल्याने ऐन वेळी त्यातील कुटुंबाना निवारा शेडमध्ये आश्रय घ्यावा लागला होता. दगड- मातीची कच्ची घरे बरेच दिवस पाण्यात राहिल्याने आतील लाकूड फाटा व अन्य साहित्य कुजून खराब होण्याची भीती असल्याने धरणग्रस्त चिंतेत होते. 

अलीकडे पाणी पातळी ओसरून पडझड झालेली घरे पाण्याबाहेर येताच धरणग्रस्तांनी त्या घरांची दारे, खिडक्‍या, खांब, लाकूडफाटा, पत्रे, दगड व अन्य साहित्य काढून सुरक्षित ठिकाणी हलविले. पुनर्वसित ठिकाणी नवीन घरे व शेड बांधताना धरणग्रस्त कुटुंबांना हे साहित्य उपयोगी पडणार आहे.

दरम्यान माहुली (सांगली) येथील गावठाणात पुनर्वसन होणाऱ्या खालच्या आवाडातील काही कुटुंबे जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मूळ गावातील घरे सोडणार नाहीत, या भूमिकेशी ठाम असल्याने प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मात्र याच गावठाणात पुनर्वसित झालेल्या काही कुटुंबांकडून जुनी घरे मोडून त्याचे साहित्य सांगली जिल्ह्यात हलविण्याची लगबग आजही सुरू दिसली. त्यासाठी एसटीच्या मालवाहतूक गाडीची मदत घेण्यात आली. या पावसाळ्यात मराठवाडी धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा आणखी वाढणार असल्याने धरणग्रस्त चिंतेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT