Satara Vidhansabha Election sakal
सातारा

Satara Assembly Election 2024 : सातारा-जावळीत ६३.५२ टक्के मतदान; सकाळी केंद्रावर गर्दी

Satara vidhan Sabha Election 2024 : सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात बुधवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ज्‍येष्‍ठ, दिव्‍यांग मतदारांना केंद्रात नेण्‍यासाठी मदत

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात बुधवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी पाचपर्यंत याठिकाणी झालेल्‍या एकत्रित मतदानाची टक्केवारी ६३.५२ टक्के इतकी असल्‍याची माहिती निवडणूक यंत्रणेकडून देण्‍यात आली.

याठिकाणच्‍या निवडणुकीसाठी महायुतीच्‍या वतीने भाजपकडून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, तर महाविकास आघाडीच्‍या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमित कदम यांना उमेदवारी देण्‍यात आली होती. त्‍यांच्‍याव्‍यतिरिक्‍त अपक्ष, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील या निवडणुकीच्‍या रिंगणात होते.

यामुळे याठिकाणच्‍या निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. प्रचाराच्‍या तोफा थंडावल्‍यानंतर बुधवारी येथील निवडणुकीसाठी प्रत्‍यक्ष मतदान झाले. सकाळच्‍या सत्रात खासदार उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, राजमाता कल्‍पनाराजे भोसले यांनी अनंत इंग्‍लिश स्कूलमधील केंद्रावर जात मतदान केले.

याचदरम्‍यान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले, ऋणालीराजे, रुद्रनिलराजे यांनी क्रांती स्‍मृती येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. कास येथील मतदान केंद्रात अमित कदम यांनी सपत्‍निक मतदान केले.

सकाळच्‍या सत्रात शहरासह परिसरातील जावळीतील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होती. यानंतर दुपारच्‍या सत्रात मतदारांची संख्‍या रोडावली. दुपारी तीननंतर पुन्‍हा एकदा मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी होण्‍यास सुरुवात झाली. ज्‍येष्‍ठ तसेच दिव्‍यांग मतदारांना मतदान केंद्रात नेण्‍यासाठी या वेळी केंद्राबाहेरील स्‍वयंसेवकांची दिवसभर धावपळ सुरू होती.

सायंकाळी सहा वाजल्‍यानंतर केंद्रात असणाऱ्या मतदारांना टोकन देत केंद्रांची प्रवेशद्वारे बंद करण्‍यात आली. सायंकाळी पाचपर्यंत सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघात ६३.५२ टक्के इतके मतदान झाले.

दिवसभरात कोठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस, विशेष सुरक्षा पथकाचे जवान कार्यरत होते.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: भारत हा महिलांच्या सन्मानाचा पुरस्कार करणारा देश आहे - कदम

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

SCROLL FOR NEXT