सातारा : बॅंका, दूध संघ, कुकुटपालन अशा एकामागोमाग एक संस्था सातारा-जावळीच्या आमदारांच्या नाकर्तेपणामुळे मोडीत निघाल्या. विकासाचे नुसते फुगवलेले आकडे सांगणाऱ्यांनी किती युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला,
किती शैक्षणिक संस्था, मोठे उद्योग साताऱ्यात आणले याचे उत्तर द्यावे, असा सवाल सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांनी प्रचारादरम्यान उपस्थित केला.
सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अमित कदम यांच्या प्रचारार्थ प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, लाकडी पूल, तेली खड्डा, गोखले हौद, न्हावी आळी, गडकर आळी, धुमाळ आळी, समाधी माळ, सर्वोदय कॉलनी, मोती चौक, फुटका तलाव, समर्थ हॉस्पिटल, गोल मारुती, सुपनेकर बोळ, मारवाडी चौक, कोटेश्वर मंदिर, अर्कशाळानगर आदी भागात पदयात्रेने शिवसंवाद दौरा केला. त्या वेळी मतदारांशी संवाद साधला.
या वेळी शहर काँग्रेसच्या अध्यक्षा रजनी पवार, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते ॲड. बाळासाहेब बाबर, शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे, प्रा. संजीव बोंडे व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. कदम म्हणाले, ‘‘अजिंक्य उद्योग समूहाचे शिल्पकार (कै.) आमदार अभयसिंहराजे भोसले यांनी मोठ्या कष्टाने विविध सहकारी संस्था उभ्या करून त्या नावारूपाला आणल्या. तथापि त्यांच्या पश्चात सहकार मोडून खाण्याचे काम कोणी केले याचे उत्तर विरोधकांनी जनतेला द्यावे.’’ यावेळी शहरातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.