Satara Crime News Sakal
सातारा

Satara Crime News: जावळीत अवैध व्‍यावसायिकांचे धाबे दणाणले

सहायक पोलिस निरीक्षक तासगावकर यांच्‍या धडाकेबाज कारवाया

सकाळ वृत्तसेवा

Satara Crime News : जावळी तालुक्यात मेढा पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दारू व मटकाविरोधी सुरू केलेल्या मोठमोठ्या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जावळी तालुक्यात वीस वर्षांपूर्वी महिलांनी इतिहास घडवताना तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनेवाडी गावापासून सुरुवात करत मेढा, करहर, कुडाळ येथील दारू दुकाने, बार मतदानांद्वारे बंद करून उभी असलेली बाटली आडवी करून दारूबंदी करताना इतिहास घडवला व संपूर्ण तालुका दारूमुक्त केला, यासाठी तालुक्यातील अनेक नेते मंडळीनी देखील दारूबंदी साठी महिलांना मदत केली होती.

काही काळानंतर बाहेरील तालुक्यातून काही पुढारी मंडळींच्या मदतीने दारूचा महापूर मात्र सुरू झाला, बेकायदा धंदे तालुक्यात ठिकाठिकाणी सुरू झाले, ते इतके बोकाळले, की अनेकांचे संसार देशोधडीला लागले.

व्यसनमुक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून तरुण महिलांना बरोबर घेऊन थेट स्वतः रस्त्यावर उतरून या धंदेवाल्यांना मुद्देमालासह पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते, मात्र तरीही तेवढ्यापूर्ती कारवाई होऊन पुन्हा हे धंदे सुरू होत होते.

आता नव्याने रुजू झालेले अधिकारी संतोष तासगावकर यांची सिंघम स्टाईल मोहीम पाहता अगदी या व्यवसायांचे पाळेमुळे काढून होत असलेल्या धडक कारवाईमुळे महिला वर्गासह तालुक्यातील जनतेमध्ये समाधान दिसून येत असून, दारूधंदे वाल्याविरोधात केलेल्या चौफेर कारवाई पाहता या धंदेवाल्याना नक्कीच चाप बसेल असे वाटत आहे.

पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ नको...

जावळी तालुक्यात आजपर्यंत झालेल्या कारवाईपैकी अत्‍यंत कमी कालावधीत तासगावकर यांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे आता त्यांच्यापुढे हे व्यवसाय पुन्हा सुरू न होणे यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत, नाहीतर ही कारवाई तात्पुरती राहून पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या,’ अशी परिस्थिती तालुकावासीयांना पाहावयास मिळू नये, अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT