Satara Jawan Vijay Kokare martyred esakal
सातारा

Indian Army : साताऱ्यानं गमावला आणखी एक जवान; जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना विजय कोकरे हुतात्मा

सैन्य दलात ते गेली चार वर्षे कार्यरत होते. जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना ते हुतात्मा झाले.

सकाळ डिजिटल टीम

जवान विजय कोकरे यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यांचे आई-वडीलही मुंबईतच राहतात.

सातारा : सातारा तालुक्याच्या परळी भागातील सांडवली वारसवाडी येथील जवान विजय रामचंद्र कोकरे (Jawan Vijay Kokare) हे जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावताना हुतात्मा झाले. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाइकांना आर्मी सेंटरकडून मिळाली आहे.

सांडवली परिसरात त्यांच्या श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले आहेत. सैन्य दलात ते गेली चार वर्षे कार्यरत होते. जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना ते हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव गावी कधी येणार आहे, याबाबत अधिकचा तपशील मिळू शकला नाही.

दरम्यान, परळी परिसर शोकसागरात बुडाला आहे. जवान विजय कोकरे यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यांचे आई-वडीलही मुंबईतच राहतात. त्यांचे वडील मुंबईत खासगी वाहनचालक आहेत. जवान विजय कोकरे यांच्या मागे आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident Video: पुण्यात बसचा थरार! चालक उतरला अन् बस चालू लागली; चालत्या गाडीतून प्रवाशांच्या उड्या

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT