khatav 
सातारा

प्रवासाला निघालाय... या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : मिरज- भिगवण राज्य महामार्गावर येथील चांदणी चौकापासून दहिवडी चौकापर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलांवरही पाणी तुंबतेय. त्यामुळे अपघातांसह अनेक समस्या निर्माण होत आहेत. बांधकाम विभागाने लवकरात लवकर किमान खड्डे भरून घेऊन लोकांना दिलासा देण्याची मागणी नागरिक व वाहनचालक करीत आहेत. 

मिरज- भिगवण हा राज्य महामार्ग येथील चांदणी चौकातून जातो. त्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जिल्हा हद्दीत प्रवेश करताच खड्ड्यांचा सामना करावा लागतो. विटा रोडवरील पुलावर मोठा व खोल खड्डा पडला आहे. पुलावरील रस्त्यावर माती साचल्याने तेथील जलवाहक नलिका जॅम झाल्याने पुलावर पाणी तुंबत आहे. चांदणी चौक व मोराळे रोडपर्यंत (फाटा) रस्त्याची चाळण झाली आहे. त्यानंतर ठिकठिकाणी खड्डे पडलेले दिसतात.

काही ठिकाणी रस्ता दोन्ही बाजूंना खचून मध्येच फुगवटा आलेला आहे. रस्त्याची लेव्हल बिघडल्याने वाहनांना झोला बसून अपघात होण्याचा धोका आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत. पाठदुखीसह मणक्‍यांचे आजार वाढत आहेत. वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मायणीतील जिल्हा हद्दीपासून दहिवडी चौकापर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे. 


रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लोकांना मणक्‍यांचे आजार होत आहेत. अपघात होत आहेत. खड्डे बुजवणे अत्यावश्‍यक आहे. 
- संजय सुर्वे, ग्रामस्थ, पिंपरी, ता. खटाव 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT