Satara Karad Municipality Majhi Vasundhara again won award sakal
सातारा

सातारा : कऱ्हाड पालिकेची 'माझी वसुंधरा' पुन्हा पहिल्या क्रमांकावर

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात कऱ्हाड पालिकेने सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी, पाच कोटींचे जिंकले पारितोषिक

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात कऱ्हाड पालिकेने सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी केली. कऱ्हाड २२६ पालिकात अव्वल ठरली असून पालिकेमे पाच कोटींच्या पारितोषिकालाही गवसणी घातली आहे. मुंबईज आज सकाळी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. त्यात राज्यातील पालिका गटात कऱ्हाड नगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावत सुमारे पाच कोटींचे बक्षीस पटकावले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. कऱ्हाड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, रोकडे, मुझफ्फर नदाफ, सुरेशं शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारला. माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नग्नि व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धत गतवर्षी नगरपालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. यावर्षी आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. निकाल जाहीर झाल्यानंतर कराड पालिकेत कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jogeshwari Fire Accident : जोगेश्वरीतील बिझनेस सेंटरला लागली भीषण आग; अनेक लोक अडकल्याची भीती

Bhaubeej Story: यम-यमुनेची कथा सांगते भाऊबीजेचं खरं महत्त्व! जाणून घ्या भाऊबीज साजरी करण्याचं कारण

Latest Marathi News Live Update : मुंबईमध्ये आज रंगणार भारत-न्यूझीलंड संघात महिला वर्ल्ड कपचा सामना

Gold Rate Today : भाऊबीजेदिवशी सोन्यात मोठी घसरण, चांदीही १० हजारांनी उतरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा नवीन भाव

Winter Wellness: हिवाळ्यात कोणती फळे खाल्यास वाढेल रोगप्रतिकारशक्ती, वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT