Satara 
सातारा

कऱ्हाडला कोरोनाचा गैरफायदा घेत वाढली अतिक्रमणे!

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : गाजावाजा करत फेब्रुवारी, मार्च महिन्यांत शहरातील अतिक्रमणे पालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाईत जमीनदोस्त केली. व्यापाऱ्यांचा विरोध असूनही ही तात्पुरती, पक्की अतिक्रमणे हटवली गेली. त्यावेळी अतिक्रमण विरोधी पथकाची घोषणा झाली. मात्र, तब्बल सात महिन्यांनंतरही ती प्रत्यक्ष कागदावरही आली नाही. अतिक्रमणविरोधी पथक असते तर कारवाई झाली असती; मात्र पथकच अस्तित्वात नसल्याने बाजारपेठेत अतिक्रमणे सुसाट झाली आहेत. 

फेब्रुवारीत अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक स्थापन करण्याची भीष्म घोषणा झाली. मात्र, सात महिन्यांनंतर त्या पथकाची निर्मिती कागदावरही नाही. शहरात तबब्ल 13 वर्षांपासून अतिक्रमणविरोधी पथकाचे काहीच काम नाही. प्रत्येकवेळी केवळ घोषणा होते. मात्र, प्रत्यक्षात पथकाचाच पत्ता नसतो, अशी स्थिती आहे. पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील या तिघांना एकत्रित येत अतिक्रमण हटाव मोहीम फत्ते केली.

मात्र, कोरोनाच्या काळातील फायदा घेत शहरात पुन्हा एकदा अतिक्रमणे बाळसे धरू लागली आहेत. बाजारपेठेत अनेक व्यापारी त्यांच्या पायऱ्या पुन्हा गटारीवर बांधू लागले आहेत. काहींनी कट्टेही बांधले आहेत. शहरातील व्यापाऱ्यांनी फलक काढण्याला विरोध केला होता. त्यावेळी ठराविक साईजचा फलक असेल, असा पालिकेने पर्याय दिला होता. त्यावरही अंतिम निर्णय नाही. तरीही शहरात लाखो रुपयांचा खर्च करून व्यापारी फलक करताहेत. मोठ्या प्रमाणात पुन्हा हातागाडेधारक आहेत. अतिक्रमण हटविताना हातेगाडेधारकांनी पालिकेला मदत केली. 

हॉकर्स झोनचा प्रश्‍नही प्रलंबित 

पालिकेने हॉकर्स झोन ठरविण्याचा निर्णय घेतला. त्यांचाही प्रश्न अद्याप पालिकेला सोडवता आलेला नाही. पालिका कोणतीच भूमिका नेटाची घेत नसल्याने शहरात अतिक्रमणे वाढताहेत. त्यावर कारवाईसाठी पथकही नसल्याने ती अतिक्रमणे सुसाट होताहेत. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT