election esakal
सातारा

कऱ्हाडला १३ ग्रामपंचायती बिनविरोध; आठ ग्रामपंचतीसाठी १८ ला मतदान

आठ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका लागल्या असुन १८ जानेवारीला मतदान होणार आहे.

- हेमंत पवार

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat Election) पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी १३ ग्रापंचायती बिनविरोध झाल्याच्या स्पष्ट झाल्या आहेत. आठ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका लागल्या असुन १८ जानेवारीला मतदान होणार आहे. तर आठ ग्रामपंचायतीच्या जागा उमेदवारी उर्ज दाखल न झाल्याने रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली.

तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यासाठी आज अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत होती. त्या अखेरच्या दिवशी तालुक्यातील गणेशवाडी, डेळेवाडी, घोलपवाडी, कंरजोशी, पाचुपतेवाडी, कचरेवाडी, यादववाडी, तारुख, आणे, शिंदेवाडी-विंग, शेळकेवाडी, अंबवडे, पाचुंद या १३ ग्रामपंचायतीसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने त्या जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील वानरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, चिंचणी, घराळवाडी, हवेलवाडी, शिंगणवाडी, भरेवाडी या ग्रामपंचायतीच्या जागा रिकाम्या राहिल्या आहेत. तर शेळकेवाडी-येवती, शितळवाडी, जुजारवाडी, मुनावळे, लटकेवाडी, शेवाळवाडी-उंडाळे, हरपळवाडी, खोडजाईवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यासाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे. हरपळवाडी येथील एका जागेसाठी तीन तर आणि खोडजाईवाडी येथे एका जागेसाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने तेथे चुरशीने मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: डॉमिनोजनंतर तुकाराम मुंढेंचा झेप्टो, इन्स्टामार्टसह फ्रुटीवर प्रहार; ११ तास छापेमारी, १४ परवाने निलंबित

BSNL ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाची 'डिजिटल भेट', एक रुपयात मोबाइल सेवा; २५ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Independence Day Live Update : पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, चंद्रकांत खैरेंचा कानमंत्र; दानवेंची गळाभेट चर्चेत

D.B. Dhamanaskar: ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन

SCROLL FOR NEXT