Murder Sakal
सातारा

कऱ्हाड : किरकोळ वाद टोकाला; बदलेच्या भावनेतून तरुणाची हत्या

मागील भांडणाचा राग मनात धरून चाकू हल्ल्यातील जखमी युवकाचा आज पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : मागील भांडणाचा राग मनात धरून चाकू हल्ल्यातील जखमी युवकाचा आज पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू (Murder) झाला. चार दिवसापूर्वी येथील दत्त चौकात दुपारी तीन वाजता घटना घडली होती. त्या प्रकरणात बैजुनाथ अशोक जिरगे (वय २९ रा. दत्त चौक, कऱ्हाड) व अजय उर्फ पिल्या अभयकुमार काळे (२५, रा. शुक्रवार पेठ) यांना अटक झाली आहे. त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सुशांत उर्फ बबलू मुरलीधर काटकर (रा. भोई गल्ली, रविवार पेठ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. (Satara Crime News)

पोलिसांनी सांगितले की, येथील रविवार पेठेतील बबलू यांच्याशी बैजुनाथ व अजय यांचा किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे बबलू बद्दल त्यांच्या मनात राग होता. तो़च राग मनात धरून त्यांनी बलूवर हल्ला केला. २५ डिंसेबरला दत्त चोकातील भूतकर चाळ येथे बबलू होता. त्यावेळी दुपारी तीन वाजता तेथे गेले. त्यांनी बबलूशी रात्री झालेल्या भंडाणावरू वाद गघालण्चायास सुरूवात केली.  

बबलूला जाब विचारताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. बैजुनाथ व अजय यांनीही वाद घातला. त्यावेळी अजयने बबलूचे हात धरले. त्याचा फायदा घेत बैजुनाथ यामने बबलूच्या पोटात चाकू भोसकला. जखमी झालेला बबलू खाली कोसळताच दोघांनी तेथून पळ काढला. तेथील नागरीकांनी बबलूला रूग्णालयात हलवले. बबलूवर उपचार सुरू होते. आज पहाटे त्याच्या मृत्यू झाला. पोलिसांनी त्यातील बौजुनाथ जिरगे व अजय काळे यांना अटक केली आहे.

बबलूच्या मृत्यमुळे पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. बबलू येथील रविवार पेठेत राहतो. त्याचा मित्र परिवारही मोठा आह, बबलूच्या मृत्यूची बातमी समजताच सकाळी येथील आझाद चौकात गर्दी केली होती. सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT