ST sakal
सातारा

कऱ्हाड-पुणे एसटी बस सुरु; प्रवाशांतून समाधान

एसटी प्रशासनाने तातडीने कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

हेमंत पवार

कऱ्हाड : एसटी कर्मचारी संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल सुरु आहेत. त्याचा विचार करुन एसटी प्रशासनाने तातडीने कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. एसटी प्रशासनाच्या अवाहनाला प्रतिसाद देत येथील एसटी हजर झालेल्या चालक, वाहकांमार्फत कऱ्हाड-पुणे, कऱ्हाड-ढेबेवाडी एसटी बस सुरु करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी दिली.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे प्रवाशी, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे. संपाचा विचार करुन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ केल्याचे सांगीतले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण हा मुद्दा लावुन धरला असुन आंदोलन सुरूच ठेवले आहे.

या परिस्थितीमुळे सतत वर्दळ असलेल्या बस स्थानकांमधील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान शासनाने एसटीच्या कर्मचाऱ्याना कठोर निर्णय न घेण्यासाठी तातडीने कामवर हजर रहावे, असे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत कऱ्हाड एसटी आगारात चालक,वाहक हजर झाले आहेत. त्यांच्यामार्फत आज कऱ्हाड-पुणे, कऱ्हाड-ढेबेवाडी या एसटी बस सुरु करण्यात आल्या आहेत. आणखी कर्मचारी हजर झाल्यावर नवीन मार्गावर सेवा सुरु करण्यात येतील. त्यासाठी कामगारांनी कामावर हजर व्हावे असे आवाहन आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी केले आहे.

५२ कर्मचारी केले निलंबीत

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटीच्या प्रशासाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत येथील एसटी आगारातील चार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तर ५२ चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती येथील आगार व्यवस्थापक श्री. मोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT