Satara : खंडाळ्यातील मुद्रांक कार्यालय सील 
सातारा

Satara : खंडाळ्यातील मुद्रांक कार्यालय सील

शासनाच्या नोंदणी व मुद्रांक दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत

रमेश धायगुडे, लोणंद.

लोणंद : शासनाच्या नोंदणी व मुद्रांक दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. खंडाळा येथील नोंदणी व मुद्रांक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही या संपात सहभागी झाल्याने आणि येथील मुद्रांक विक्रेते, दस्त लेखनिक संघटना यांनीही या संपाला पाठिंबा दिल्याने खंडाळा येथील मुद्रांक व नोंदणी कार्यालय सील ठोकून बंद ठेवण्यात आले आहे.

तालुक्यातील विविध गावांतून या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मात्र या कार्यालयाच्या दरवाजाचे सील पाहून कोणतेही काम न करता मोकळ्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. राज्याचे महसूल, मुद्रांक व नोंदणी अतिरिक्त मुख्य सचिव व अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना यांच्यात मुंबई येथे सचिवांच्या दालनात ७ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या चर्चेदरम्यान संघटनेला दिलेल्या आश्वासनानुसार एकाही मागणीची पूर्तता झाली नाही. त्यामुळे संघटनेकडून आजपासून बेमुदत संप करण्यात आला आहे.

नोंदणी व मुद्रांक कार्यालयातील गेल्या पाच- सहा वर्षांपासून रखडलेली पदोन्नती त्वरित करावी. पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश लागू करू नयेत. सर्व विभागांतील रिक्त पदे तत्काळ भरावीत. वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक यांच्या ज्येष्ठता याद्या २०१८ पासून प्रलंबित आहेत. त्या अंतिम करून त्वरित प्रसिद्ध कराव्यात. कोविड १९ मुळे मृत पावलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत द्यावी व अनुकंपा तत्त्वावर आशा कुटुंबातील व्यक्तीस नोकरीत सामावून घ्यावे आदी २१ मागण्यांसाठी संघटनेने हा संप पुकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SCROLL FOR NEXT