Satara 
सातारा

कृष्णा अभिमत विद्यापीठ टॉप 100 मध्ये

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा)  : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांची श्रेणी जाहीर झाली आहे. त्यामध्ये 100 विद्यापीठांच्या यादीत कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने स्थान पटकाविले आहे. वैद्यकीय शिक्षण संस्था गटात कृष्णा विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्ट 50 संस्थांमध्ये गणले गेले आहे; तर महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

केंद्रीय मन्युष्यबळ विकास मंत्रालयामार्फत दरवर्षी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग एनआयआरएफ फ्रेमवर्क यादी तयार केली जाते. त्यानुसार सन 2020 मधील देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची व शैक्षणिक संस्थांची यादी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी नवी दिल्लीत जाहीर केली. देशात सुमारे 800 हून अधिक विद्यापीठे आहेत. त्यात कृष्णा अभिमत विद्यापीठाने देशातील टॉप 100 मध्ये बाजी मारली आहे. त्यात "कृष्णा' 90 व्या स्थानी आहे. वैद्यकीय शिक्षण विभागात देशातील सर्वोत्कृष्ट 50 वैद्यकीय शिक्षण संस्थांत "कृष्णा' 37 व्या, राज्यात तिसऱ्या स्थानावर आहे. 

कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख (कै.) जयवंतराव भोसले यांनी कृष्णा वैद्यकीय शिक्षण संस्थेची सुरवात केली. 2005 मध्ये अभिमत विद्यापीठाला मान्यता लाभली. विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाची घोडदौड सुरू आहे. कृष्णामध्ये अत्याधुनिक शिक्षण प्रणालीसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैद्यकीय शिक्षण दिले जाते. कृष्णा अभिमत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एक हजार 100 बेडच्या सुसज्ज कृष्णा हॉस्पिटलचे आरोग्य क्षेत्रात कार्य आहे. 

कोरोना साथीच्या काळात हॉस्पिटलचे कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत 177 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. कृष्णामध्ये कोविड-19 च्या चाचण्यादेखील केल्या जात आहे. कोरोना लस संशोधन प्रकल्पात सहभागी झालेल्या देशभरातील निवडक 40 संस्थांमध्ये कृष्णा हॉस्पिटलचाही समावेश आहे. 


""ग्रामीण भागात आरोग्य शिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने स्थापन झालेली ही संस्था अवघ्या 15 वर्षांत देशातच नाही तर जगभरातही नावारूपाला येत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. येत्या काही वर्षांत देशातील सर्वोत्कृष्ट दहा विद्यापीठांमध्ये येण्याचा आमचा मानस आहे.'' 

- डॉ. सुरेश भोसले, 
कुलपती, कृष्णा अभिमत विद्यापीठ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT