Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

साताऱ्यातील गोंदवल्यात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी; जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण आदेश

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी टाळण्यासाठी गोंदवले बुद्रुक येथे प्रशासनाने येत्या गुरुवारी-शुक्रवारी संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहेत. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शुक्रवारी पहाटे श्रींच्या समाधीवर गुलाल फुलांची उधळण होणार आहे, तसेच गुरुवारी होणारा आठवडा बाजार देखील रद्द करण्यात आला आहे.

श्रींचा 107 वा पुण्यतिथी महोत्सव 31 डिसेंबर पासून समाधी मंदिरात सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी हा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. शासनाच्या नियमावलीनुसार, सर्व खबरदारी घेऊनच नियोजित वेळेत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येत आहे. तसेच पालखी मिरवणूक टाळून श्रींच्या पादुका वाहनातून श्रीराम भेटीसाठी नेण्यात येत आहेत. या महोत्सवाच्या मुख्य गुलालाच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी पहाटे भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गुरुवारी व शुक्रवारी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

याच अनुषंगाने प्रशासनाने देखील खबरदारी म्हणून गोंदवल्यात येत्या आज मध्यरात्रीपासून शुक्रवार मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत.अत्यावश्यक सेवा वगळता गावातील इतर सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार बी. एस. माने यांनी दिली. तसेच गुरुवारी होणारा आठवडा बाजार देखील रद्द करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोंदवल्यातील यात्रा रद्द करण्यात आली आहे. या महोत्सवाच्या मुख्य दिवशी संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
-बाई माने, तहसीलदार, माण

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पत्रव्यवहार करूनही सुरक्षा व्यवस्था नव्हती!नागपूरमधील स्फोटानंतर बारूद कामगार संघटना आक्रमक, कंपनीवर गंभीर आरोप

Tejas Express Delay: ऐन होळीच्या सणात रेल्वेचा 'शिमगा'! तेजस एक्सप्रेस ७ तास उशिरा सुटणार, प्रवाशांचे प्रचंड हाल

इस्रायल-इराण युद्धामुळे दुबईत अडकले भारतीय, मदतीसाठी टोल फ्री नंबर जारी; नाव नोंदणी करण्याचं आवाहन

Video : ईश्वरीचा जीव धोक्यात पाहून अखेर अर्णवने दिली प्रेमाची कबुली; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

UP Holi Tradition: या गावात होळीला का खेळला जात नाही रंग? भगवान श्रीकृष्ण आणि भक्त प्रल्हादाशी आहे थेट संबंध, हे आहे भावुक कारण

SCROLL FOR NEXT