Satara News Leopard News 
सातारा

जेवण करून शतपावलीसाठी गेलेल्या युवकांवर बिबट्याचा हल्ला; पाटणातील घटनेने नागरिकांत घबराट

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : जेवण करून शतपावली करण्यासाठी गेलेल्या युवकांवर बिबट्याने हल्ला केला. पाटण तालुक्यातील शेडगेवाडी-विहे येथे शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता घटना घडली. ऋषिकेश अरविंद थोरात (वय 20) असे संबंधित युवकाचे नाव आहे. 

शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता विहे जवळच्या शेडगेवाडी येथे जेवण करून शतपावली करण्यास गेलेल्या मुलांच्या घोळक्या समोर अचानक बिबट्या आला. बिबट्या समोरासमोर आल्याने मुलेही घाबरली आणि बिबट्या बिथरला. बिबट्याने त्यातील एकावर घाबरून हल्ला केला, त्यात ऋषिकेश जखमी झाला. 

शिंदेवाडीत बिबट्याचा थरार; कुत्र्याला ठार करून लटकवले जांभळीच्या झाडावर

बिबट्याने त्याच्या पायाला नखाने ओरबडले आहे. दरम्यान, शेजारील अन्य लोकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या तेथून पळून गेला. घटनेची माहिती समजताच वनक्षेत्रपाल विलास काळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पहाणी केली आहे. जनावरांवर हल्ले करणारा बिबट्या आता नागरिकांवर हल्ले करू लागल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. त्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chamoli Tunnel Collapse: अचानक स्फोटाचा आवाज, काही क्षणांत टनल बनली ‘मृत्यूचा सापळा’; 7 जणांचा मृत्यू, वाचलेल्यांनी सांगितला थरार

MD Smuggling: एमडी तस्करीसाठी दुबईतून फंडिंग; जरीपटका येथील मुख्य आरोपीविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस

Maharashtra River Linking: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प; याच वर्षी काम सुरू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून 5,737 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू

Kolhapur Baby Death : दूध पाजताना काळजी घ्या! अवघ्या 31 दिवसांच्या बाळाचा ठसका लागून दुर्दैवी अंत; कोल्हापुरातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

SCROLL FOR NEXT