Satara Latest Rain News
Satara Latest Rain News 
सातारा

सातारा जिल्ह्यात 'अवकाळी'ची दमदार हजेरी; माण, खटाव, महाबळेश्वरात पीक, फळबागांचे मोठे नुकसान

Balkrishna Madhale

सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यात काल (गुरुवार) अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. आजही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच, सर्वत्र धुक्यांसह ढगाळ वातावरण आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 

जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक भागात सूर्यप्रकाशही नाही. दरम्यान, काल दुपारी व रात्री जोरदार अवकाळी पाऊस झाला. यापावसाने शेतातील ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. माण तालुक्यातील म्हसवड, खटाव, सातारा, महाबळेश्वर, वाई कोरेगाव तालुक्यातही पावसाचा शिडकाव झाला. ढगाळ वातावरण व हलका पावसामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. तर, अनेक ठिकाणी वाऱ्यासह दमदार पाऊस झाल्याने पिकं आडवी झाली आहेत. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्याचा रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली होती. पिकांची अवस्था चांगली असतानाच पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान होणार आहे. या ढगाळ वातावरणाचा परिणाम प्रमुख पिकांवर होत असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

या अवकाळी पावसाचा व प्रतिकूल वातावरणाचा द्राक्ष पिकास फटका बसला आहे. द्राक्षांवर भुरी, घडकुज, दावण्या आदी रोगांचा प्रादुर्भावाची भिती निर्माण झाल्याने फवारण्या करण्याकडे कल वाढला आहे. खटाव तालुक्यातील कलेढोण, मायणी, तरसवाडी, पाचवड, गारळेवाडी, मुळीकवाडी, हिवरवाडी, विखळे, शिंदेवाडी (कलेढोण), कानकात्रे, अनफळे उत्तर कोरेगाव परिसरातील बहुतांशी शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, सातत्याने बदलणारे हवामान, ढगाळ वातावरण, धुके, कडाक्‍याची थंडी आदी संकटाना सामोरे जावे लागत आहे. स्ट्रॉबेरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत. याशिवाय आंब्याचा मोहरही झडल्याचे दिसत आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास शेतकरीवर्गाला मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT