Satara 
सातारा

मसूरसह परिसराची "डेंजर झोन'कडे वाटचाल, कोरोना बाधितांची संख्या पोचली 16 वर

गजानन गिरी

मसूर (जि. सातारा) : मसूरसह जुन्या कवठ्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने व बाधितांच्या संख्येत भर पडत चालल्याने संपूर्ण विभाग "डेंजर झोन'कडे वाटचाल करत आहे. 15 दिवसांपूर्वी येथे पाच बाधित आढळल्यानंतर पुन्हा आता एका बाधिताची भर पडली, तर मसूरच्या सभोवताली शामगाव, खराडे, चिखली, वाण्याचीवाडी, यादववाडी, जुने कवठे याठिकाणी आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 पर्यंत गेली आहे. एकूणच कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून, आरोग्य, पोलिस, महसूल, ग्रामपंचायत प्रशासन यंत्रणेची चांगलीच दमछाक सुरू झाली आहे. 

येथील एका महिलेचा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आलेला आहे. गावच्या पूर्वेला शिवाजीनगर भागात या महिलेचे घर असून, प्रसूतीसाठी ती कृष्णा रुग्णालयात दाखल झाली आहे. या बाधित महिलेच्या घरातील आठ जण विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत. या भागात निर्जंतुकीकरणाचे काम आज सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी रमेश लोखंडे यांनी सांगितले. महिलेच्या सोबतीला असणाऱ्या नातेवाईक महिलेचाही बाधित असल्याचा अहवाल अगोदरच शनिवारी आला होता. ती वाण्याचीवाडीतील बंगला नावाच्या भागातील आहे. 

जुने कवठे गावात 32 वर्षांच्या एकाचा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. चिंचवड- पुण्याला तो कामानिमित्त आहे. दहा जुलै रोजी त्याला ताप, खोकल्याचा त्रास झाल्यामुळे तो कऱ्हाडला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला. त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यास कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा स्वॅब घेतल्यानंतर तपासणीमध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील घरातील तिघा जणांना कऱ्हाडला विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत कवठे गावात घरोघरी सर्व्हे सुरू केला असून, आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश देशमुख यांनी सांगितले. यादववाडीचे 11, वाण्याचीवाडी एक, मसूर आठ, जुने कवठेच्या तीन जणांसह एकूण 23 जणांचा अहवाल आज अपेक्षित आहे. यावरून पुढची साखळी लांबणार का, खंडित होणार? याकडे संपूर्ण भागाचे लक्ष लागले आहे. 

मुंबई-पुणेकर परतले अन्‌ झाला कोरोनाचा प्रवेश! 

मसूर विभागामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ द्यायचा नाही, या निर्धाराने प्रशासनाने कंबर कसली होती. मात्र, लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर मुंबई-पुण्याहून गावाकडची मंडळी परतली अन्‌ कोरोनाचा प्रवेश झाला. बाधितांची साखळी सुरू झाली. त्यामुळे आरोग्य, पोलिस, महसूल, ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच दमछाक सुरू झाली आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT