karad 
सातारा

मारुल हवेली परिसरात बिबट्याची दहशत

विलास माने

मल्हारपेठ ः गावठी कोंबड्यांच्या शिकारीसाठी बिबट्या फेऱ्या मारत असल्याने मारुल हवेली (ता. पाटण) येथील नागरिकांना त्याचे सतत दर्शन होत आहे. खाद्याच्या शोधात फिरणारा बिबट्या आता दिवसादेखील नरजेस पडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

मारुल हवेली विभागात बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून कायम आहे. खाद्याच्या शोधात भटकणाऱ्या तीन बिबट्यांचे दर्शन वारंवार होऊ लागले आहे. काल (ता. 13) सकाळी सहा वाजता मारुल हवेली येथील दिवशी रस्त्याच्या बाजूच्या एका घरातून बिबट्याने कोंबडी पळवली. त्यानंतर पुन्हा आठ वाजता बिबट्या त्याठिकाणी आल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. आरडाओरड करून त्यास धुडकावून लावल्यानंतर काही वेळानंतर आकरा नावाच्या परिसरात तो पुन्हा दिसून आला. याठिकाणी तीन बिबट्या असल्याचे पाहणाऱ्या नागरिकांकडून सांगितले जात आहे. येथील भरळी, माळ, गणेशनगर भागात त्यांचे सारखे दर्शन होत आहे. उसाच्या शेतात बिबट्या लपून बसत असल्याने शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे. 

दिवसेंदिवस बिबट्याचा लोकवस्तीतील शिरकाव वाढत आहे. त्यामुळे महिला व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. पहाटे, दुपारच्या वेळी, सायंकाळी अथवा रात्रीच्या सुमारास कधीही बिबट्या नजरेस पडत आहे. काही वेळेला बिबट्या रस्त्यावरून वाहनधारकांना आडवा जात आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कायम होत असताना वन विभाग मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी होत आहेत. 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO: जिओ धन धना धन! एकाच दिवसात 3,000 रुपयांचा नफा? अलॉटमेंट फायनल; पाहा GMP, लिस्टिंग प्राइस आणि महत्त्वाचे अपडेट्स

ज्ञानेश कुमारांनी सहकाऱ्यांना का नाही सांगितलं? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाकडून अनेक प्रश्न अनुत्तरीत

Pune Graduate Election : पुणे पदवीधरच्या मतमोजणीपूर्वीच गोंधळ; पेन, कागद नेण्यास पोलिसांचा मज्जाव; प्रभाकर देशमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

Indian Railway Travel Rules : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा नियम! लोकल अन् गाड्यांमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावाल तर थेट 1,000 रुपये दंड आणि 6 महिन्यांची जेल

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात; आधी ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणार

SCROLL FOR NEXT