jawali
jawali 
सातारा

हाकेच्या अंतरावर बिबट्या दिसला अन..!

सकाळ वृत्तसेवा

नागठाणे (जि. सातारा) : भरतगाववाडी (ता. सातारा) येथे बिबट्याचे पुन्हा एकदा दर्शन घडल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

भरतगाववाडी येथील श्रीकांत मोहिते व प्रकाश पवार हे दोघे हर्णेशा नावाच्या शिवारात दुचाकीवरून निघाले असताना अगदी काही अंतरावरच त्यांना बिबट्याचे दर्शन घडले. दुचाकीच्या आवाजाने बिबट्याने झाडीत धूम ठोकल्याचे संबंधितांनी नमूद केले. गेल्याच आठवड्यात प्रवीण पवार यांच्या नंबर नावाच्या शिवारात, तसेच दीपक कणसे यांचे बोराटा नावाच्या शिवारात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले होते. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागास कळविले. त्यानंतर सायंकाळी वन अधिकारी संजय धोंडवड तसेच वनरक्षक साधना राठोड, चालक धनंजय लादे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन संबंधित ठिकाणी पंचनामा केला. पावलांचे ठसे पाहिल्यानंतर संबंधित वन्यप्राणी बिबट्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय धोंडवड यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे ग्रामस्थांना याबाबत कल्पना दिली. 

गावात ठिकठिकाणी "बिबट्याच्या बाबतीत घ्यावयाची काळजी' यासंदर्भातील पोस्टर लावण्यात आली आहेत. शेतामध्ये जाताना चार ते पाच जणांनी समूहाने जाणे, हातात काठी घेऊन जाणे, एकट्याने शेतात जावू नये तसेच सायंकाळी कामाव्यतिरिक्त जास्त वेळ थांबू नये, घरी येताना समूहाने येणे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. सध्याच्या दिवसात शेतात कामांची लगबग सुरू असल्याने ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. या वेळी दीपक कणसे, प्रकाश पवार, किशोर मोहिते, अमर बागल, प्रशांत चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT