Shashikant Shinde vs Udayanraje bhosale esakal
सातारा

Satara Lok Sabha Result: साताऱ्यात शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंना दिला दणका! ८६ हजार मतांनी आघाडीवर...

Satara Lok Sabha Result 2024: शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली, तर भाजपने उदयनराजे प्रतापसिंह भोसले यांना संधी दिली.

Sandip Kapde

सातारा लोकसभा जागा ही देशातील ५४३ लोकसभा आणि महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांपैकी एक आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी येथे मतदान झाले. सातारा मतदारसंघात ५४.७४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या लोकसभा मतदारसंघातून १६ उमेदवार रिंगणात होते, मात्र मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात आहे. आज दोन्ही उमेदवारांचे भवितव्याचा फैसला होणार आहे.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली, तर भाजपने उदयनराजे प्रतापसिंह भोसले यांना संधी दिली. उदयनराजे प्रतापसिंह भोसले हे शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज आहेत. पहिल्या फेरीनंतर शरद पवार गटाचा राष्ट्रवादी ने २३९ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर थोडी रस्सीखेंच सुरु होती. मात्र ११,१२ व्या फेरीनंतर मोठा फरक पडला आहे.

शशिकांत शिंदे ११ व्या फेरी अखेर ६१ हजार मतांनी आघाडीवर होते. तर आता १२व्या फेरी अखेर ८६ हजार मतांनी शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे.

उदयनराजे प्रतापसिंह भोसले यांच्या उमेदवारीसाठी मोठा उशीर झाला होता. उमेदवारीसाठी उदयनराजे यांनी दिल्लीत मुक्काम ठोकला होता. तर शरद पवार यांनी शशिकांत शिंदेंना उमेदवारी देत मोठा डाव खेळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT