सातारा

त्यांनी राष्टवादीत जाऊन नगराध्यक्षपद पटकाविले, आता भाजपात गेलेत खरे; पण...

सकाळ वृत्तसेवा

लोणंद (जि. सातारा)  : नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सचिन शेळके- पाटील यांच्या विरुद्ध एकूण 17 पैकी 13 नगरसेवकांनी एकत्र येऊन दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सोमवार (ता. 22) दुपारी 12 वाजता लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले- राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
 
नगराध्यक्ष श्री. शेळके यांच्याविरुद्ध 17 पैकी 13 नगरसेवकांनी 12 जून 2020 रोजी ते नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. प्रत्येक महिन्याला सर्वसाधारण सभा बोलावणे कायद्याने बंधनकारक असताना जाणीवपूर्वक ही सभा बोलावत नसल्यामुळे नगरपंचायतीचे दैनंदिन कामकाज वेळच्या वेळी होत नाही आदी कारणे देत जिल्हाधिकाऱ्यांकडे तसे सह्यांचे पत्र देऊन अविश्वास ठराव दाखल केला आहे. या अविश्वास ठरावावर नगरसेवक हणमंतराव शेळके-पाटील, विकास केदारी, शैलजा खरात, हेमलता कर्नवर, राजेंद्र डोईफोडे, कृष्णाबाई रासकर, किरण पवार, स्वाती भंडलकर, ऍड. पुरुषोत्तम हिंगमिरे, लक्ष्मणराव शेळके- पाटील, लीलाबाई जाधव, योगेश क्षीरसागर, दीपाली क्षीरसागर या 13 कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत. या वेळी आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.
 
नगराध्यक्ष श्री. शेळके हे सुरुवातीला अपक्ष निवडून आले आहेत. त्यानंतर राष्टवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून ते नगराध्यक्ष झाले, तर काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या विशेष सभेत त्यांच्या विरोधातातील अविश्वास ठराव मंजूर होणार का? फेटाळला जाणार? याकडे संपूर्ण लोणंदकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सह्या करणाऱ्या 13 पैकी 12 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.

मटका अड्यावर छापा; साताऱ्यातील महिला ताब्यात, एक लाख 95 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI New Rules 2026 : AI व्हिडिओ बनवून पोस्ट करताय? मोदी सरकारचा मोठा धक्का; आता होणार डायरेक्ट कारवाई, नवे नियम पाहा सविस्तर

Land law Reform Maharashtra : धडाकेबाज निर्णय! एनए परवानगीची सक्ती रद्द; जमीन महसूल कायद्यात मोठा बदल

ठाकरे ठाकरे - मोदी मोदी, BMC सभागृहात शिवसेना ठाकरे गट अन् भाजप आमने-सामने; फडणवीसांसमोरच जोरदार घोषणाबाजी

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; दोन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

'आता विषय संपला नाहीतर...' बिग बॉस घरातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली दिव्या शिंदे! म्हणाली…

SCROLL FOR NEXT