murder sakal
सातारा

लोणंद : भावांकडून एकाचा खून; लाकडी दांडक्याने केली मारहाण

अज्ञात कारणावरून सालपे येथील दोघा भावांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून खून

रमेश धायगुडे, लोणंद.

लोणंद : सालपे (ता.फलटण) येथे शेरेचीवाडी (ता.फलटण) येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात कारणावरून सालपे येथील दोघा भावांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना काल (ता. ३०) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर हे दोघे भाऊ फरारी झाले आहेत. लोणंद पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत या फरारी भावांचा ठावठिकाणा लावण्यास पोलिसांना यश आले नाही.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शेरेचीवाडी (ता. फलटण) येथील मोलमजुरी करणारे बापू संभाजी निकम (वय ३८) हे काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सालपे येथे लोणंद-सातारा रस्त्यालगत असलेल्या एसटी बस स्थानकासमोरच्या पिंपळाच्या झाडाखाली थांबले असता सालपे येथील गौरव संजय जगताप व सौरव संजय जगताप या दोघा भावांनी तेथे येऊन बापू निकम यांना कोणत्या तरी अज्ञात कारणांवरून लाकडी दांडक्याने मारहाण केली.

त्यात बापू निकम यांच्या डोक्यात, कपाळावर, हातावर जोरदार मार लागल्याने व वर्मी घाव बसल्याने ते जागीच ठार झाले. त्या ठिकाणी उपस्‍थित लोकांनी ही घटना प्रत्यक्ष मारहाण होत असताना पाहिली असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत सालपे गावचे पोलिस पाटील शांतराव साळुंखे यांनी लोणंद पोलिस ठाण्यास तसेच शेरेचीवाडी गावचे पोलिस पाटील प्रथमेश सूर्यवंशी यांना कळवले. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन १०८ क्रमांकाची अँब्युलन्स बोलावून लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले.

मात्र, तत्पूर्वीच ते मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन फरारींच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना केली. मृत बापू निकम यांचे मामा शामराव कोंडिबा कणसे (वय ६२, रा. शेरेचीवाडी) यांनी याबाबत लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून, सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT