सातारा

महाबळेश्वर : अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा : संजय भागवत

सकाळ वृत्तसेवा

महाबळेश्वर ः महाबळेश्वर तालुक्‍यातील अतिवृष्टीमुळे अगर नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी समन्वयाने तत्काळ सादर करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दिले.
 
येथे पंचायत समितीच्या आढावा सभेच्या वेळी श्री. भागवत बोलत होते. कोरोना 19 चा संपूर्ण तालुक्‍याचा आढावा, निसर्ग वादळ नुकसानीचा आढावा व सर्व विभागाकडील विविध योजनांची आढावा बैठक आयोजिली होती. या सभेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, तहसीलदार सुषमा पाटील, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, तालुक्‍याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, सभापती अंजना कदम, उपसभापती संजूबाबा गायकवाड, सदस्य आनंदा उतेकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप व तालुक्‍यातील सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. तालुक्‍यामध्ये कोविड 19 अंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा आढावा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम व डॉ. शहा यांनी दिला. थर्मोमीटरने तपासणी करताना लगेच न करता 100 पाऊले चालून नंतर टेंप्रेचर घ्यावे, अशी सूचना करण्यात आली.
 
नगरपालिका क्षेत्रात आशा पदे मंजूर नाहीत, तरी मलकापूर नगरपंचायतीप्रमाणे प्रस्ताव सादर करून मंजुरीनंतर पदे भरावीत, याबाबत मुख्याधिकारी दगडे यांना सूचना करण्यात आल्या. निसर्ग वादळाने झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. पंचायत समितीच्या कृषी, ग्रामपंचायत, आरोग्य, पशुसंवर्धन आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, घरकुल, प्रलंबित लेखा शक पूर्तता या विषयांचा आढावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी घेऊन सूचना केल्या. तालुक्‍यातील विविध समस्या बाळासाहेब भिलारे व उपसभापती संजूबाबा गायकवाड यांनी मांडल्या. विस्तार अधिकारी सुनील पार्टे यांनी स्वागत केले. गटशिक्षण अधिकारी आनंद पळसे यांनी आभार मानले.

Video : मोदी सरकार एका हातानं देतंय, दुसऱ्या हातानं घेतंय : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT