दहिवडी (जि. सातारा) : बहरात आलेले बटाट्याचे पीक, बाजारात चांगली मागणी व उत्तम दरामुळे आनंदित असलेल्या बोथे (ता. माण) येथील शेतकऱ्यांच्या आनंदावर अतिवृष्टीने विरजण घातले. शेतातच बटाटा सडल्याने शेतकऱ्यांचे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बोथे हे गाव बटाटा या पिकाचे मोठे उत्पादन घेणारे गाव म्हणून ओळखले जाते. यावर्षी या गावात विक्रमी म्हणजेच तब्बल एक हजार क्विंटल बटाटा बियाणाची लागण करण्यात आली होती. ज्यांनी लवकर लागवड केली होती, अशा काही शेतकऱ्यांनी बटाटा काढून विकला. त्यांना अपेक्षित उत्पन्नसुध्दा मिळाले. मात्र, साधारण 40 टक्के शेतकऱ्यांच्या शेतातील बटाटा शेतातच होता. अशावेळी ऐन बटाटा काढणीच्या सुमारास पावसास सुरुवात झाली.
सलग आठ दिवस मुसळधार पाऊस पडल्याने पाणी शेतातच साठून राहिले. त्यामुळे बटाटा शेतातच सडण्यास सुरुवात झाली. काही जणांनी पावसातही बटाटा बाहेर काढला. मात्र, योग्य ठिकाणी साठवणूक करण्यापूर्वीच तो बटाटा नासला. यामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. बटाटा पिकाकरिता गुंतवलेले भांडवलदेखील परत मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बोथ्यात साधारणपणे एक हजार क्विंटल बियाणाचे अंदाजे दहा हजार क्विंटल एवढे उत्पादन मिळाले असते. सध्या सरासरी क्विंटलला 2500 रुपये दर आहे. म्हणजे 2.5 कोटी रुपयांच्या आसपास रक्कम बोथ्यात आली असती. परंतु, अतिवृष्टीमुळे अंदाजे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
""अतिवृष्टीमुळे बटाटा पिकाची खूप मोठी हानी झाली असून, नुकसानीची पाहणी करून शासनाने भरपाई द्यावी. शासनाने आर्थिक मदत करून आम्हाला दिलासा द्यावा.''
-गणेश कदम, बटाटा उत्पादक शेतकरी, बोथे
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.