Satara loudspeakers dj sound permission 
सातारा

Satara : साताऱ्याच्या आवाजाला मर्यादा घालणार कोण?

पोलिसांपुढे आव्हान; ध्वनिक्षेपकाला परवानगी मिळाली, पण वादाच्या प्रसंगांची शक्यता

- प्रवीण जाधव

सातारा : उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावूनही न सुटलेला जिल्ह्यातील ध्वनिक्षेपकबंदीचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात वाजवण्याची परवानगी देत काल निकाली काढला. परवानगी देताना ध्‍वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारीही त्यांनी पोलिसांवर टाकली आहे. त्यातून वादाचे प्रसंग निर्माण होणार असल्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात, प्रामुख्याने सातारा शहरात आवाजावर मर्यादा घालण्याचे पोलिस दलासमोर आव्हान राहील.

शांतता समितीच्या साताऱ्यात झालेल्या बैठकीपासून जिल्ह्यात ध्वनिक्षेपक वाजणार का? हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. सुरवातीला परवानगी देतो, असे म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांनी ‘यु टर्न’ घेत ध्वनिक्षेपकाच्या दणदणाटाला परवानगी दिली जाणार नसून आवाजाच्या मर्यादेत स्पिकर परवाना दिला जाणार असल्याचे जाहीर केले. पोलिस अधीक्षक यावर अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले होते. परंतु, ध्वनिक्षेपकास परवानगी मिळाल्याचा आनंदोत्सव चालक-मालक साजरा करत होते.

त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी ध्वनिक्षेपकाबाबत ठोस भुमिका घेत परवानगी देऊ नये, तसेच याबाबतची सर्व यंत्रणा जागच्या जागी सीलबंद करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. कालपर्यंतच्या बैठकांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिस अधिकारी ध्वनिक्षेपकावर बंदी राहणारच, असे ठामपणे बोलत होते. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी दिली. रात्री बारापर्यंतची मर्यादाही त्यात नाही. ती देताना आवाजाची मर्यादा सांभाळण्याबरोबरच पोलिसांना कारवाईचेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे उत्सव काळात विशेषत: मिरवणुकांमध्ये होणारा दणदणाट रोखण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागणार आहे.

ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासाची सर्वांनाच कल्पना आहे. लहान मुले, गर्भवती स्त्रिया, आजारी व वृद्ध नागरिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्‍यता असते. या सर्वांचा विचार करून शासन व न्यायालय दोन्हीही पातळीवर गेल्या काही वर्षांपासून ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर मर्यादा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. साताऱ्यातही काही वर्षांपूर्वी तसे ते सुरू होते. तत्कालीन पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी पहिल्यांदा गणेशोत्सवातील दणदणाटावर अंकुश बसवला.

डॉ. अभिनव देशमुख यांच्या काळात तर, हा प्रश्न उच्च न्यायालयात गेला. तरीही ध्वनिक्षेपकाच्या दणदणाटाला परवानगी मिळाली नव्हती. विद्यमान पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनीही गेल्या वर्षी ध्वनिक्षेपकाच्या दणदणाटावर बंदी घातली होती. तत्पूर्वी साताऱ्यात दणदणाट करण्यावरून अनेकदा पोलिसांना आव्हाने देण्यात आली. एका मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजामुळे भिंत पडून एकाला जीवही गमवावा लागला आहे.

साताऱ्याचा पूर्व इतिहास...

आगामी काळात पालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी काहीही केले जाऊ शकते. साताऱ्यातील हा पूर्व इतिहास पाहता मंडळांच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना आवाजाची मर्यादा पाळायला लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर असेल. पोलिस अधीक्षकांनी त्याबाबत आत्तापासून नियोजन करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT