khatav
khatav 
सातारा

प्रेमीयुगुलांना लुटणारे अखेर सापडलेच

सकाळ वृत्तसेवा

खंडाळा (जि. सातारा) : खंबाटकी घाट परिसरात प्रेमीयुगुलांना लुटणारी व गेले सहा महिने पोलिसांना चकवा देणारी जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या टोळीतील तिघांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. एक लाख 59 हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, नऊ जानेवारीला राष्ट्रीय महामार्गावरून साताऱ्याकडे जाताना खंबाटकी घाटात भैरवनाथ मंदिराजवळील पायी रस्त्यावर फिर्यादी व त्यांची मैत्रिण थांबले होते. त्यावेळी दोन अज्ञात व आणखी दोन साथीदारांनी मैत्रिणीच्या गळ्याला चाकू लावला, तर दुसऱ्या चोरट्यांनी फिर्यादीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून त्यांच्याकडील दोन मोबाईल, सोन्याची अंगठी, रोख रक्कम व मोटारसायकल जबरदस्तीने चोरून नेली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला. सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे तपास करीत होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस नाईक सचिन वीर, प्रशांत धुमाळ, बालाजी वडगावे व सुरेश मोरे यांनी मोबाईल फोन व घटनास्थळावरून डाटा संकलित करून तांत्रिक बाबींच्या आधारे काही संशयित क्रमांक काढून त्याचा सखोल तपास केला. त्यामध्ये संजय जाधव याने ही चोरी केल्याचा संशय घेण्यात आला. 

रविवारी (ता. 5) संशयित दादा ऊर्फ संजय जाधव हा खंबाटकी घाटमार्गे जाणार असल्याची खात्रीशीर बातमी पथकाला मिळाली. त्याप्रमाणे खंडाळ्यातील जुन्या टोलनाक्‍यावर सापळा लावून संजय जाधवला ताब्यात घेतले. संजयसह त्याचे साथीदार पप्पू सर्जेराव जाधव (रा. रामोशी वस्ती, मुळीकवाडी, ता. फलटण), तुषार बाळासाहेब पाटोळे (रा. तरडगाव, ता. फलटण) व अजित महादेव बोडरे (रा. तांबवे, ता. फलटण) यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकलसह दोन मोबाईल असा एकूण एक लाख 59 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. एक संशयित फरारी आहे. हनुमंत गायकवाड तपास करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT