guava sakal
सातारा

महाबळेश्वरातील म्हाळुंगेत रान गव्याच्या हल्यात महिला जखमी

सौ. सुनीता संपत झोरे याना चार दिवसांपूर्वी रानगव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी व्हावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

कास : मौजे म्हाळुंगे तालुका महाबळेश्वर येथील रहिवाशी सौ. सुनीता संपत झोरे याना चार दिवसांपूर्वी रानगव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी व्हावे लागले. दुर्गम कांदाटी खोऱ्यात म्हाळुंगे गाव वसले आहे. या परिसरात सातत्याने मानसांवर होणार्या हल्ल्यांमुळे वनविभागाने समस्येवर काहीतरी पर्याय काढावा अशी मागणी होत आहे. सुनिता पाणीवट्यावरून पाण्याचे हांडे घेऊन येत असताना रान गव्याने त्यांच्यावर हल्ला केला.

त्या हल्यात त्यांना जबरदस्त मुकामार बसला आहे. त्यांच्यावर तापोळा येथे उपचार सुरु आहेत. त्यांचा जीव थोडक्यात वाचला आहे असे त्या सांगत आहेत, रान गव्याने ज्यावेळेस हल्ला केला. तेव्हा त्यांच्या डोक्यावरील हांडे त्यांनी रान गव्याच्या दिशेने फेकले व त्यानी जाळीमध्ये उडी मारली पण रान गव्याने तोंडाने मुसंडी मारल्यामुळे त्या जवळपास एक तास बेशुद्ध अवस्थे त्याच ठिकाणी पडून होत्या. त्या पाण्यावरून घरी आल्या नाहीत म्हणून त्यांच्या मुलांनी घरातून आवाज दिला पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया न दिल्यामुळे त्यांच्या मुलांनी पाणवटयाच्या वाटेने शोध सुरू केला त्यावेळी वाटेच्या बाजूला त्या मूर्च्छित पडलेल्या त्यांना सापडल्या त्यांना उचलून घरी आणल्यानंतर २/३ तासानंतर त्या शुध्दीवर आल्यानंतर गव्याने हल्ला केलेल्याची सर्व माहिती त्यांनी दिली. १५ दिवसातील या भागातील ही दुसरी घटना आहे.

अशा प्रकारे सतत होणाऱ्या गव्यांच्या हल्य्यामुळे स्थानिक रहिवाशी जीव मुठीत घेऊन बाहेर पडत आहेत. या भागात रान गव्याच्या उपद्रवामुळे येथील सर्व शेतकरी हैराण झालेले आहेत. भात शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान रान ग्यव्यांकडून कडून सतत होत आहे. त्यामुळे सोळा गावातील शेतकरी हैराण झालेले आहेत. तरी या रान गव्यांचा वन खात्याने बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना योग्य ती मदत करावी अशी मागणी येथील सोळा गावातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT