शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी टाकली बांधावर Sakal
सातारा

महाबळेश्वर : अवकाळी पावसाने नुकसान; शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी टाकली बांधावर

सायंकाळी ही पावसाने हजेरी लावल्याने आज अक्षरशः शेतकऱ्यांनी फळे तोडून उकिरड्यावर टाकली.

रविकांत बेलोशे

भिलार : अवकाळी पावसाने महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे आतोनात नुकसान झाले असून आज सायंकाळी ही पावसाने हजेरी लावल्याने आज अक्षरशः शेतकऱ्यांनी फळे तोडून उकिरड्यावर टाकली. सध्या असलेले ढगाळ वातावरण, दाट धुके आणि मुसळधार पावसाने स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसाने फळे नासली असून पिकावर करपा गेला आहे. त्यामुळे काही दिवस स्ट्रॉबेरी मिळणे दुरापास्त होणार आहे. तर हा बहर मात्र पूर्णपणे वाया गेला असून येत्या नाताळला स्ट्रॉबेरी मिळेल की नाही याची शास्वती देता येणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

याबाबत पांचगणी येथील शेतकरी राजेंद्र कासूर्डे यांनी सांगितले अवकाळी पावसाने आमचे स्ट्रॉबेरी पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून स्ट्रॉबेरी नासल्याने ती आम्ही शेवटी टाकून दिली आहे. तर यावेळी शशिकांत भिलारे म्हणाले ऐन हंगामात आम्हाला मोठा फटका बसला असून शासनाने याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी सांगितले स्ट्रॉबेरी चे झालेल्या नुकसानिबाबत आपण कृषी विभागाशी संपर्क साधला असून पंचनामे करून नुकसान भरपाई साठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, विशाल कासूर्डे, संतोष दुधाणे, कृष्णा दुधाणे, राजेंद्र कासूर्डे आदी शेतकरी उपस्थित होते.

अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून या नुकसानीचे पंचनामे शासन पातळीवर तातडीने करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी. शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी.

- तानाजी भिलारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT