Satara esakal
सातारा

Satara : महू-हातगेघरचे पाणी शिवारात पोचेनाच!

२५ वर्षांपासून सुरू आहे प्रकल्प; कालव्याचे काम अद्याप अपुरे

सकाळ डिजिटल टीम

हुमगाव/ करहर : धरणे झाली. मात्र, कालव्याच्या अपुऱ्या कामामुळे पाण्याचा एक थेंबही शिवारात पोचलेला नाही. त्यामुळे महू-हातगेघर कालव्याच्या झारीतील शुक्राचार्य नक्की कोण? असा संतप्त सवाल जावळीतील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. गेल्या २५ वर्षांपासून हे प्रकल्प सुरू असून, आतापर्यंत या प्रकल्पांवर सुमारे ९०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

१९९५ मध्ये तत्कालीन आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्या कार्यकाळात कुडाळी प्रकल्पाला मंजुरी मिळाली. यामध्ये महू व हातगेघर याठिकाणी ही धरणांची कामे सुरू झाली. सुरुवातीच्या काळात वेगाने सुरू झालेले हे दोन्ही प्रकल्प नंतरच्या काळात कधी निधीअभावी, तर कधी पुनर्वसनातील अडचणींमुळे रखडले. पुढे जावळीचे तत्कालीन आमदार शशिकांत शिंदे स्वत: जलसंपदामंत्री असून देखील विदर्भ, मराठवाड्याच्या अनुशेषामुळे या प्रकल्पांना निधी देऊ शकले नाहीत.

सध्या या दोन्ही प्रकल्पांत पाणीसाठा अडविण्यात आला आहे; परंतु कॅनॉल व पोटपाटाची कामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत. हे दोन्ही कॅनॉल बंदिस्त पाइपलाइनद्वारे असून, त्यापैकी डावा कालवा हा एकूण १८ किलोमीटर लांबीचा असून, १७.४०० किलोमीटर पूर्ण झाला आहे. तर उजवा कालवा ३२ किलोमीटरचा असून, तो २६ किलोमीटर पूर्ण झालेला आहे. डावा मुख्य कालवा वहागाव गावच्या ग्रामस्थांकडून घेतल्या गेलेल्या हरकतींमुळे २०० मीटर जोडण्याचे काम शिल्लक आहे. तर उजव्या कालव्याचे सहा किलोमीटर काम अपूर्ण आहे.

अशी आहे वस्तुस्थिती

२०१८ मध्ये या प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत करून त्यावर ६६५ कोटी निधी टाकण्यात आला. २०१९ ला पोटपाटासाठी निविदा काढून हे काम जैन इरिगेशनला देण्यात आले. या कामाची मुदत एक वर्षाची होती. मात्र, कंपनीकडून काम वेळेत पूर्ण न झाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. या प्रकल्पासाठी दुसरी निविदा काढताच मूळ कंपनीने त्यावर आक्षेप घेत स्थगिती दिली आहे. न्यायालयातून परवानगी घेऊन सध्या जैन इरिगेशन हे काम करत आहे. सध्या ८० कोटी निधी शिल्लक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT