Ashalata Gaikwad 
सातारा

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन : आशालता गायकवाड

- प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : मोरघर (ता. जावळी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीमती आशालता नारायण गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. जावळीच्या राजकारणात केंद्रस्थानी असणाऱ्या मोरघर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुरेश गायकवाड, भानुदास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने विजय मिळविला होता. त्यावेळी वॉर्डप्रमाणे सदस्यांना संधी देण्याचे ठरल्याप्रमाणे उपसरपंच कृष्णात हिरवे यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. (satara-marathi-news-ashalata-gaikwad-vice-president-saygoan)

या पदाच्या निवडीसाठी सरपंच रंजना मोरे, निवडणूक निर्णय अधिकारी शोभा सोनावणे, ग्रामसेवक सतीश गायकवाड, तलाठी बी. एन. आंबवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपसरपंचपदासाठी श्रीमती गायकवाड यांचा एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सोनावणे यांनी त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली. याप्रसंगी सुरेश गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य बजरंग गायकवाड, सुनीता पालवे, शशिकांत गायकवाड, कृष्णात हिरवे, सुलाबाई डोईफोडे, अर्चना डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच मोरे यांनी गायकवाड यांचे स्वागत केले.

निवडीनंतर गायकवाड म्हणाल्या, ‘‘माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली आहे. त्याप्रमाणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सदस्यांना बरोबर घेऊन प्रयत्न करेन. प्रलंबित विकासकामे पूर्ण करेन.’’ उपसरपंच गायकवाड यांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शारदा धनावडे, सभापती जयश्री गिरी, उपसभापती सौरभ शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, अमर गायकवाड, न्यायाधीश देवेंद्र गायकवाड, सुनील धनावडे, शशिकांत गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, नीलेश गायकवाड, धनाजी गोरे, मारुती धनावडे, पपू जेधे, सुभाष पालवे, पोलिस पाटील सुहास भोसले, विकास गायकवाड, संतोष पालवे, मनोहर पालवे यांच्यासह ग्रामस्थ, महिलांनी अभिनंदन केले. दत्ता गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. विनोद गायकवाड यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna River Pollution : कृष्णा नदीसह शेरीनाल्यात फेकल्या मेलेल्या कोंबड्या, सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळ; रात्री दहा ते बारादरम्यान 'स्टिंग ऑपरेशन'

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

JPSC-JSSC घोटाळ्याचा तपास वेगात; दिल्लीतून ISN संचालकाला अटक, ८०० OMR शीटची पडताळणी सुरू

धक्कादायक! उद्यापासून IND vs SL कसोटी मॅच अन् त्यापूर्वी खेळाडूंच्या मारहाणीत श्रीलंकेतील क्रिकेट प्रशिक्षकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'अरे मनमोहना...' फेम आशा काळे आठवतात का? अनेक वर्षांनी आल्या कॅमेरासमोर; अभिनेत्रीला पाहून नेटकरी भारावले

SCROLL FOR NEXT