covid19 vaccination system
सातारा

दहिवडी : लसीकरण केंद्र की आठवडा बाजार ?

कोरोना चाचणीसाठी आलेले संशयित बाधित सर्व आवारात मोकाट फिरत असतात. एवढेच नव्हे तर रॅट टेस्ट केलेल्या रुग्णांना त्यांचा अहवाल घेण्यासाठी कर्मचारीच रुग्णालयाच्या आत बोलवतात.

रुपेश कदम :

दहिवडी (जि. सातारा) : येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी आज अक्षरश: बाजार भरला होता. ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे सुरक्षित शारीरिक अंतराचा (Social Distance) फज्जा उडाला होता. (satara marathi news covid19 vaccination center dhaiwadi social distance)

18 ते 44 वयोगटासाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचे केंद्र करण्यात आले आहे. याठिकाणी 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण केले जाते. यासोबतच कोरोना चाचणीची सोयही येथे आहे. साेमवारी सकाळी आठ वाजल्यापासून या सर्व वयोगटातील व्यक्तींची लसीकरण, तसेच कोरोना चाचणी करण्यासाठी एकच झुंबड ग्रामीण रुग्णालय आवारात उडाली होती. अक्षरशः माणसांचा बाजार भरल्यासारखी अवस्था होती. कोणाचा कोणाला मेळ नव्हता. माण तालुक्‍यासह जिल्ह्यातून एवढेच काय परजिल्ह्यातूनही नागरिक लसीकरणासाठी या ठिकाणी आले होते.

मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे सुरक्षित अंतराचा बोजवारा उडाला होता. त्यातच लसीकरणासाठी आलेले व कोरोना चाचणीसाठी आलेले सर्व जण गर्दीत एकमेकांत मिसळून गेले होते. त्यामुळे हे ठिकाण कोरोना पसरविण्यासाठी कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. अशी गर्दी लसीकरण व चाचणीसाठी होणार असेल, तर लॉकडाउनचा फायदा काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या केंद्रावरील कारभारावर नागरिकांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. ऑनलाइनच्या नावाखाली लसीकरण यादी बदलते. ढिसाळ कारभारामुळे उन्हातान्हात रांगेत उभ्या असणाऱ्या ज्येष्ठांना आज चक्कर आली. या ठिकाणी ना छत व ना पिण्याचे पाणी. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

कोरोना चाचणीसाठी आलेले संशयित बाधित सर्व आवारात मोकाट फिरत असतात. एवढेच नव्हे तर रॅट टेस्ट केलेल्या रुग्णांना त्यांचा अहवाल घेण्यासाठी कर्मचारीच रुग्णालयाच्या आत बोलवतात.

satara marathi news covid19 vaccination center dhaiwadi social distance

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT