Gondawale 
सातारा

लहान मुलांना काेराेनाची बाधा; गोंदवले बुद्रुकची दुकाने बदं

फिराेज तांबाेळी

गोंदवले (जि. सातारा) : कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी होत असल्याने जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच बाधितांमध्ये वाढ झाल्याने आज (बुधवार) पुन्हा गाेंदवले ‘लॉक’ करण्यात आले आहे. सकाळी एकाच भागात ११ रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तातडीने नागरिकांची घरोघरी जाऊन आराेग्य तपासणीची मोहीम सुरू केली आहे आहे. (satara-marathi-news-gondawale-lockdown-continues-covid19-patients-increased)

गोंदवल्यात आत्तापर्यंत एकूण ४१२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर ११ रुग्ण दगावल्याची नोंद शासन दरबारी आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी गावात रुग्णसंख्या दहा होती. त्यात काल एकाची भर पडली असली तरी कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याची समाधानकारक बाब होती. जिल्ह्यातील रुग्णासंख्येत मोठी घट होत असल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोंदवल्यात मात्र अद्यापही निर्बंध शिथिल केले नव्हते. येत्या दोन ते तीन दिवसांत निर्बंध शिथिल होण्याची शक्यता असतानाच आज (बुधवारी) सकाळी पुन्हा येथील रुग्णसंख्या वाढली. एकाच वेळी तब्बल ११ रुग्णांची भर पडल्याने अजूनही कोरोनाचा धोका असल्याची बाब अधोरेखित झाली.

गावात अचानक रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाने उपाययोजना वेगवान केल्या आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मदतीने आरोग्य विभागाने गावात तातडीने सर्वेक्षण सुरू केले आहे. संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी प्रांताधिकाऱी शैलेश सूर्यवंशी यांनी अत्यावश्यक सेवा वगळता गोंदवले लॉकच ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाची तिसरी लाट?

विशेषतः आज आढळलेल्या बाधितांमध्ये लहान मुलांची संख्या लाक्षणिक आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे का, अशी शंकाही उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT