Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

ओबीसींची जनगणना करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; संघटनेचा प्रशासनाला गर्भित इशारा

जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी, ओबीसींना लावलेली क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करावी आणि रखडलेली मेगा नोकरभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशा मागण्यांसाठी पाटण तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने आज येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे आंदोलन करण्यात आले. 

तहसीलदार प्रशांत थोरात यांना निवेदन देण्यात आले. ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या वेळी तालुकाध्यक्ष प्रकाश सुतार, शहराध्यक्ष आनंदराव गुरव, विकास ढवळे, राजाभाऊ कांबळे, विजय महादर, अरुण देवकांत, नीलेश बांडे, नरेंद्र खांडके व ओबीसी बांधव उपस्थित होते. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

त्यात म्हटले आहे, की ओबीसींना आरक्षण लागू होऊन 26 वर्षे झाली तरी 17 हजार नोकऱ्यांचा बॅकलॉग भरलेला नाही. ओबीसींना लावलेली क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करावी. त्यामुळे ओबीसींना घटनात्मक आरक्षणाचा लाभ मिळत नाही. या सर्व प्रकारामुळे रोजगाराविना तरुणांच्या पिढ्या बरबाद होत आहेत. शासनाने कोणत्याही प्रस्थापित, मनुवादी, विषमतावादी आणि स्वार्थी प्रवृत्तींच्या आहारी न जाता रखडलेली मेगाभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, ओबीसींची जनगणना करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT