corona  sakal
सातारा

तिसरी लाट थोपविण्यासाठी 22 ऑक्‍सिजन प्लॅंट, मुलांसाठी हॉस्पिटल

उमेश बांबरे

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (covid19 second wave) बाधितांची संख्या वाढल्याने सातारा जिल्ह्याची "रेड झोन'मध्ये नोंद झाली. या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी (covid19 third wave) जिल्हा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. एक हजार बेड, 20 ऑक्‍सिजन प्लॅंट (oxygen plant) , सर्व कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटरमध्ये लागणारे पुरेसे मनुष्यबळ, जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण (vaccination) पूर्ण करण्यावर भर अशी तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासोबतच 90 कोटींच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली असून त्यापैकी 15 कोटी उपलब्धही झाले आहेत. (satara-marathi-news-precautaions-to-stop-corona-third-wave)

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. दोन ते अडीच हजार रुग्णांवरून आता 1,600 रुग्णांपर्यंत बाधितांचे आकडे खाली आले आहेत. बाधितांची टक्केवारी 14.70 आहे. आगामी आठ दिवसांत हा आकडा हजार रुग्णांपर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामध्ये बेडची उपलब्धता न होणे, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर्स न मिळणे, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आणि कोरोना प्रतिबंधक लशीचा अपुरा पुरवठा आदींचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील साडेसात लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3,677 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दुसऱ्या लाटेत ज्यात जिल्हा कमी पडला, त्यात तातडीने उपलब्ध करण्यावर आता जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्‍यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारनेही प्रत्येक जिल्ह्याला इशारा दिला आहे. त्यानुसार दुसऱ्या लाटेत "रेड झोन'मध्ये गेलेल्या सातारा जिल्ह्यावर सर्वांनीच लक्ष केंद्रित केले आहे. दुसऱ्या लाटेतील त्रुटी दूर करून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने आतापासूनच उपाययोजना करून ठेवण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये बाधित रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय हॉस्पिटल्स, कोरोना केअर सेंटर तसेच सर्वच खासगी हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांसाठी बेडची उपलब्धता करून ठेवली जाणार आहे.

त्यातून सुमारे 800 ते एक हजार बेडची संख्या वाढणार आहे. रुग्णांना वेळेत ऑक्‍सिजन मिळण्यासाठी 22 ठिकाणी ऑक्‍सिजन प्लॅंट उभारले जाणार आहेत. 15 ठिकाणी पीएसयू युनिट व पाच ठिकाणी मोठे ऑक्‍सिजन प्लॅंट उभारले जात आहेत. ग्रामीण आरोग्य केंद्रातही ऑक्‍सिजनचे पीएसयू युनिट बसविले जाणार आहेत. लहान मुलांसाठी प्रत्येक ठिकाणी कोरोना केअर सेंटर व हॉस्पिटलमध्ये बेडची सोय केली जाईल. त्यासाठी बालरोग तज्ज्ञांची समिती तयार केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाधित मुलांवर उपचार केले जातील.

या सर्व उपलब्ध कोरोना केअर सेंटर व हॉस्पिटल्समध्ये मनुष्यबळाचा मुद्दा उपस्थित होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील, बाहेरच्या राज्यातून मनुष्यबळ उपलब्ध केले जाणार आहे. त्यामध्ये नर्से, डॉक्‍टरांचा समावेश आहे. आगामी दोन महिन्यांत लसीकरणावर भर दिला जाणार आहे. तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जिल्ह्याला तब्बल 90 कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. त्यापैकी सध्या प्राथमिक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी 15 कोटी उपलब्ध झाले आहेत. आणखी निधीही लवकरच उपलब्ध केला जाणार आहे.

या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे

कॉन्ट्रॅक्‍ट ट्रेसिंग सुरू करणे

बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांचे विलगीकरण

लहान मुलांना संसर्ग होऊ नये यासाठी जागृती

पुरेसा औषधसाठा उपलब्ध करणे

लहान मुलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल

तज्ज्ञ डॉक्‍टरांची सल्लागार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT