सातारा

वाई : व्यापारी ओसवाल यांच्या खूनाचा आराेप ज्योतीने फेटाळला

प्रवीण जाधव

सातारा : वाईतील व्यापारी ओसवाल यांच्यासह त्यांच्या मारेकऱ्यांसह चौघांचा खूनही ज्योती व तिच्या सहकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप न्यायालयात बचाव पक्षाने गुरुवारी केला. यानंतर ज्योतीने तिच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. जिल्हा न्यायालयात वाईतील सहा जणांच्या खून प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

हे खून वाईतील कथित डॉक्‍टर संतोष पाेळ (Santosh Pol) याने केले होते. बचाव पक्षाकडून माफीचे साक्षीदार ज्योती मांढरे (Jyoti Mandhare) हिचा उलट तपास घेताना सलग दुसऱ्या दिवशीही बचाव पक्षाने तिच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. पोलिसांशी हातमिळवणी करून ज्योती मांढरे ही ब्लॅकमेल करून पैसे उकळायची. वाईतील व्यापारी ओसवाल यांचा खूनही ज्योती व तिची बहीण, भावजी यांनी मारेकऱ्यांना सांगून केला. मारेकरी आपले नाव घेतील म्हणून संबंधित मारेकऱ्यांचाही खून ज्योतीने केला. असे एकूण चार खून ज्योतीने केल्याचा आरोप बचाव पक्षाने केला आहे. ओसवाल यांचा खून करणारे ज्योतीच्या घराशेजारी राहात होते व ते ज्योतीच्या परिचयाचे होते, असा आरोपही बचाव पक्षाने केला. या वेळी ज्योतीने हे सर्व आरोप खोटे असल्याचे न्यायालयात सांगितले. 

पुणे- मुंबईला जाणा-या प्रवाशांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

दरम्यान, ज्योती मांढरेवर केलेल्या आरोपाचे पुरावे अद्याप न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याचे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले. या सुनावणीवेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे स्वतः हजर होते. या खटल्याची पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार आहे. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT