सातारा

पुणे- बंगळूर महामार्गावरील अपघातात बंगळूर, वसईच्या महिला ठार; तिघे जखमी

विलास साळूंखे

भुईंज (जि. सातारा) : पुणे- बंगळूर महामार्गावरील सुरूर गावानजीक भरधाव कार पलटी झाल्याने कारमधील दोन महिला ठार, तर तीन जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. रागिणी जयवंत खैरनार (वय 47, रा. बंगळूर) व ऊर्मिला दिवाकर गांगुर्डे (वय 81, रा. वसई) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारी कार (एमएच 02 इयू 6276) भरधाव वेगाने निघाली होती. त्या वेळी चालकाचा ताबा सुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. त्यातील सर्व जण गंभीरपणे जखमी झाले होते.

सुरूर ग्रामस्थांनी मदतकार्य देत सर्व जखमींना साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यातील दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत झाल्याचे सांगण्यात आले. रागिणी जयवंत खैरनार व ऊर्मिला दिवाकर गांगुर्डे अशी मृतांची नावे आहेत. शैलेंद्र गांगुर्डे, सोहम गांगुर्डे, नील खैरनार हे तिघेही जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत 
हा अपघात नेमका कसा झाला याबाबत भुईंज पोलिस रात्री उशिरापर्यंत पंचनामा व तपास करीत होते. 

प्रत्यक्ष घटनास्थळी अपघात पाहणाऱ्यांनी दुभाजकाला कार वेगात धडकल्याचे सांगितले. भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, हवालदार अवघडे, मुंगसे करीत आहेत. 

शिवेंद्रसिंहराजेंचा राष्ट्रवादीच्या नेत्याला इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

INDW vs AUSW Live: स्मृती मानधना-शफाली वर्मा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड! हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

SCROLL FOR NEXT