धरणग्रस्तांनी उभारलेला लढा, sakal
सातारा

Satara : ‘मराठवाडी’त केवळ १८ टक्के पाणीसाठा

शिल्लक कामांचा पावसाळ्यापूर्वी निपटारा करण्यासाठी वांग नदीत विसर्ग सुरूच

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी : मराठवाडी धरणाच्या काही शिल्लक कामांचा उरक करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने धरणात १८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी धरणाचे बांधकाम पूर्ण करून त्यात पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्याचे शासनाचे प्रयोजन असून, हा दिवस पाहण्यासाठी वांग खोऱ्याला तब्बल २६ वर्षे प्रतीक्षा करावी लागली आहे.

धरणग्रस्तांनी उभारलेला लढा, आंदोलने आणि त्यातील सातत्य यामुळे मराठवाडी धरण संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. १९९७ मध्ये धरणाच्या बांधकामाला प्रारंभ झाला. मात्र, ते पूर्णत्वास येण्याला २६ वर्षे उलटली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत या धरणाचा समावेश झाल्यापासूनच बांधकामाला मोठी गती मिळाली.

२.७३ टीएमसी क्षमतेच्या या धरणाचे लाभक्षेत्र कऱ्हाड व पाटण तालुक्यांत असून, येथील प्रकल्पग्रस्तांचे टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात व त्या परिसरात पुनर्वसन झाल्याने तिकडेही एक टीएमसी पाणी पाठविण्याचे प्रयोजन केले आहे. बारा वर्षांपूर्वी धरणाची अंशतः घळभरणी झाली, तेव्हापासून लाभक्षेत्रात बागायती पट्टा वाढला आहे.

पूर्ण क्षमतेने पाणी साठल्यावर वांग खोरे अधिकच समृद्ध बनणार आहे. कसल्याही परिस्थितीत जूनपूर्वी शिल्लक कामांचा निपटारा करून पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवायचा निर्धार पाटबंधारे विभागाने केल्याने गेल्या काही दिवसांपासून धरणातून सलग विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.

जलाशयातील अंतर्गत कामे तसेच शिल्लक दगडी अस्तरीकरण, काँक्रिटीकरण आदी कामे जून पूर्वी मार्गी लावण्यासाठी कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक अभियंता (श्रेणी एक) नईम सुतार, शाखा अभियंता निखिल खांडेकर, के. जे. इन्फ्राचे प्रकल्प व्यवस्थापक संदीप मोरे आदींच्या देखरेखीखाली सध्या शिल्लक कामांचा निपटारा धरणस्थळी सुरू आहे.

धरणाची सध्याची पाणी स्थिती पुढीलप्रमाणे आहे. पाणीपातळी ६३५.६०० मीटर, एकूण पाणीसाठा १४.४५८ दशलक्ष घनमीटर, जिवंत पाणीसाठा- १४.२२८ दशलक्ष घनमीटर, टक्केवारी- १८.४६४ टक्के, एकूण पाऊस- १२०१ मिलिमीटर, सिंचनद्वारे विसर्ग १५० क्युसेक. दरम्यान पाणीसाठा कमी झालेला असला, तरी उन्हाळाभरासाठी तो पुरेसा ठरेल. टंचाई भासणार नाही असे पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचा हिचा भीषण अपघात, ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत आणलं, Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT