बाजार समितीची निवडणूक sakal
सातारा

Satara : साताऱ्यात रंगणार दुरंगी सामना?

आमदार गटापुढे स्वाभिमानीचे आव्हान; उद्या होणार चित्र स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

सातारा : येथील बाजार समितीची निवडणूक वेगळ्या वगळणावर आली आहे. आमदार गटाच्या पॅनेल विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पॅनेल अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमदार गटाने ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले; पण त्यांना अद्यापपर्यंत यश आलेले नाही. गुरुवारी (ता. २०) अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने त्याच दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेवटपर्यंत झुंज देणार की ऐनवेळी अर्ज मागे घेणार? यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

बाजार समितीची निवडणूक यापूर्वी अनेकदा बिनविरोध झाली आहे; पण त्यानंतर ही निवडणूक लढत होऊन आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाने आपली सत्ता अबाधित ठेवली होती. यावेळेस आमदार भोसले गटाने बिनविरोधचे प्रयत्न केले. मात्र, बदललेले नियम आणि शेतकऱ्यांना मिळालेली निवडणुकीत सहभागी होण्याची संधी, यामुळे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. समितीच्या १८ जागांसाठी ६१ अर्ज दखल होते.

त्यापैकी आजअखेर सहा जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे ५५ उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत आहे. तोपर्यंत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीतून खासदार उदयनराजे भोसले गटाने अलिप्त राहणे पसंत केले आहे, तर काही जणांच्या मते स्वाभिमानी शेतकरी संघटनेला खासदार उदयनराजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT