Satara News esakal
सातारा

Satara News: बाजार समित्यांचे बिगुल एप्रिलमध्येच

जिल्ह्यातील ५२ सोसायट्यांच्या निवडणुका प्रलंबित

सकाळ वृत्तसेवा

सातारा : न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार याची उत्सुकता लागली होती; पण जिल्ह्यातील तब्बल ६० विकास सेवा सोसायटींच्या निवडणुका प्रलंबित असून, त्याच्या निवडणुका १८ मार्चपर्यंत संपवून त्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू होईल.

नवीन ग्रामपंचायत सदस्यांचा मतदानाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर ३० एप्रिलपर्यंत बाजार समित्यांच्या निवडणुका संपवाव्यात, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.

त्यामुळे नव्या सदस्यांना समावून घेऊन मतदार यादी झाली, की बाजार समितींचा कार्यक्रम लागेल, असे चित्र होते. मात्र, जिल्ह्यातील विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुका प्रलंबित होत्या.

त्यामुळे अशा प्रलंबित ५२ विकास सेवा सोसायटींची निवडणूक १८ मार्चपर्यंत संपविण्याची सूचना सहकार निवडणूक प्राधिकरणाने केल्या आहेत. त्यामुळे सहकार विभागाने ५२ सोसायटींचा कार्यक्रम सुरू केला आहे.

यामध्ये सातारा तालुक्यातील सात, कोरेगाव आठ, फलटण आठ, पाटण सात, खटाव सात, वाई एक, माण तीन आणि कऱ्हाड ११ अशा ५२ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये कऱ्हाड, कोरेगाव, फलटण तालुक्यांतील सर्वाधिक विकास सेवा सोसायट्यांचा समावेश आहे.

१८ मार्चपर्यंत या निवडणुका पूर्ण करून त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींचा निवडणूक कार्यक्रम लागणार आहे.

त्यासाठी प्रथम बाजार समितीत नव्याने मतदान करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यांचा मतदार यादीत समावेश करून यादी अद्ययावत केली जाईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम सुरू होईल.

जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, कोरेगाव, फलटण, वाई, वडूज, लोणंद या नऊ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. बाजार समितीची सत्ता आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी राष्ट्रवादी- कॉँग्रेस, कॉँग्रेस, भाजप, दोन्ही शिवसेनेचे नेते सध्या सक्रिय झाले आहेत.

...असे असेल संचालक मंडळ

बाजार समितीसाठी सोसायटी गटातून ११ सदस्य निवडले जातात. त्यामध्ये खुल्या गटातील उमेदवारांसह दोन महिलांचा समावेश असतो.

ग्रामपंचायतीतून चार सदस्य निवडले जातात. त्यात ग्रामपंचायतीतून अनुसूचित जमातीमधील एक, एक आर्थिक दुर्बल आणि अन्य दोन सदस्य निवडले जातात. त्याचबरोबर आडत व्यापारी गटातून दोन, तर हमाल मापाडी गटातून एक सदस्य असे १८ सदस्य निवडले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देव तारी त्याला कोण मारी! केदारनाथ प्रलयात मृत्यू झाल्याचं समजून प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले, पण तो १० वर्षांनी पुण्यात सापडला

बाई हा काय प्रकार? १०० वेळा 'जब वी मेट' बघणाऱ्यांच्याही लक्षात आली नसेल चित्रपटातली ती चूक; शेवटच्या गाण्यात...

Pune News : देशाचा जीडीपी वाढण्यात सहकाराची मोठी मदत होईल - प्रा डॉ. दुर्गाडे; सन्मित्र सहकारी बँकेच्या वतीने पतसंस्थांसाठी सहकार मेळावा!

Nashik Pune Railway : नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरवरूनच जाणार! रेडिओ दुर्बिणीचे कारण अयोग्य; पर्यायी मार्गासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा लढा

Christmas Tree History: पहिला ख्रिसमस ट्री कोणत्या देशात तयार झाला? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT