औषधी गोळ्या 
सातारा

अहो आश्‍चर्यम्‌... किराणाच्या दुकानात औषधी गोळ्यांची विक्री

सकाळ वृत्तसेवा

उंब्रज (जि. सातारा) : उंब्रजसह मसूर, पाल, चाफळ, तारळे या परिसरातील अनेक किराणा दुकानदार अनधिकृतपणे औषधी गोळ्यांची विक्री करत आहेत. कोरोना आजाराच्या भीतीने ग्रामीण भागातील डॉक्‍टर रुग्ण तपासणी करत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक लोक किरकोळ आजार अंगावर काढता काढता नव्या आजारांना निमंत्रण देताना दिसत आहेत. त्याचाच गैरफायदा घेत अनेक दुकानदार किरकोळ आजारांवरील गोळ्यांची अपुऱ्या माहितीच्या आधारे विक्री करत आहेत. या गोळ्यांचा दुकानदारांना घरपोच पुरवठा करण्यात येतो, तर संबंधित गोळ्या पुरवठा करणारी टोळी परिसरात कार्यरत असून, त्याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 

दुकानात मिळणाऱ्या गोळ्या अनेक असाध्य रोगास निमंत्रण देत आहेत. ग्रामीण भागातील लोक आजार एक व औषध दुसरे घेत आहेत. अपुऱ्या माहितीच्या आधारे घेतले जाणारे आणि केले जाणारे उपचार नागरिकांसाठी जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. 

सध्या कोरोना आजाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच खासगी डॉक्‍टरही रुग्ण तपासत नाहीत, तर आरोग्य कर्मचारी संख्या कमी असल्याने ते ग्रामीण भागापर्यंत पोचू शकत नाहीत. यामुळे लोक किरकोळ आजारी पडले तर ते लपवत असून ताप, कणकणी, खोकला, सर्दी, अंगदुखी या आजारासाठी दुकानात मिळणाऱ्या गोळ्या खात आहेत. यामुळे आजारांवर अचूक निदान होत नसल्याने लोक जास्त प्रमाणात आजारी पडत असल्याचे अनेक समाजधुरिणांचे म्हणणे आहे. संबंधित दुकानदारांना औषधी गोळ्यांची विक्री करण्याची परवानगी नसताना त्या त्यांच्यापर्यंत पोच कशा होतात आणि त्या कोण पुरवठा करते असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. त्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देऊन अशा टोळीचा पर्दाफाश करावा, अशीही मागणी पुढे येऊ लागली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT