Satara 
सातारा

दुधाचा भाव 34 वरून 20 रुपयांपर्यंत खाली, शेतकरी अडचणीत

सकाळ वृत्तसेवा

कुकुडवाड (जि. सातारा) : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये दुधाचा भाव 34 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत खाली आला असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दूध दरवाढ करण्यासह दूध उत्पादकांना प्रतिलिटर दहा रुपये अनुदान देण्याची आग्रही मागणी माणच्या तहसीलदार श्रीमती बाई माने यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

दूध दर खाली आल्याच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी अडचणीत आला असल्याने संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्षाचे माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रा. सचिन होनमाने यांनी हे निवदेन माणच्या तहसीलदारांना दिले आहे. याबाबत प्रा. होनमाने हे "सकाळ'शी बोलताना म्हणाले, ""लॉकडाउनमुळे शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे. दुधासह शेतमालाचे भाव घसरले असल्याने पशुपालक शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीबरोबर पशुपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. दुधाचा भाव 34 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने जनावरांसाठी आवश्‍यक पेंडीचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे दुग्ध व्यवसाय धोक्‍यात आलेला आहे. त्यात शेतकरी घायकुतीला आलेला आहे. 

महादेव जानकर हे मंत्री असताना दुधाला पाच रुपये प्रतिलिटर अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करत होते. आता दुधाचा भाव फारच कमी झाल्यामुळे शासनाने दूध दरवाढ तत्काळ करून प्रतिलिटर दहा रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करावे. याप्रश्‍नी शेतकऱ्याचे कैवारी म्हणवून घेणाऱ्यांनी दूध दरवाढीत लक्ष घालावे, अन्यथा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रा. होनमाने यांनी निवेदनातून दिला आहे. या वेळी "रासप'चे कायदेशीर सल्लागार ऍड. विलासराव चव्हाण, शरदराव दडस, विद्यार्थी आघाडीचे माण तालुकाध्यक्ष उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT