Satara 
सातारा

अनावश्‍यक फिरणाऱ्यांवर दिसताक्षणी कारवाई करा, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना विभागात कोरोनाचा वाढत चाललेला विळखा ही चिंतेची बाब आहे. कोरोनाची साखळी तयार होता कामा नये. अजूनही वेळ गेलेली नाही. कोयनावासीयांनी स्वयंशिस्त पाळून कोरोनाला विभागातून हद्दपार करावे. आठ दिवस सगळे कोयनानगर पूर्णपणे बंद ठेवावे. दुकानांनी जीवनावश्‍यक वस्तूंची "होम डिलिव्हरी' करावी. शहरात अनावश्‍यक फिरणाऱ्या लोकांवर दिसताक्षणी कारवाई करावी. मुंबईत जसा कायदा राबवला जात आहे, तसा कायदा कोयनेत व ग्रामीण भागात राबवावा, असे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. 

कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या कोयनानगरला काल गृहराज्यमंत्री देसाई यांनी शासकीय अधिकारी वर्गासह भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, पाटण पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, माजी सदस्य हरीश भोमकर, शिवदौलत बॅंकेचे संचालक अशोकराव पाटील, माजी सरपंच शैलेंद्र शेलार, मनीष चौधरी, भाजपचे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, सहायक पोलिस निरीक्षक महेश भावीकट्टी आदी प्रमुख उपस्थित होते.

या वेळी गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, ""कोरोनामुळे सील झालेल्या गावांतील जनतेला जीवनावश्‍यक वस्तूंसह आरोग्य सुविधांची कोणतीच गैरसोय भासणार नसल्याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. कोयना विभागात कोरोनाची साखळी वाढू नये, यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कोयनानगरवासीयांनी आठ दिवस कडकडीत बंद पाळावा. या काळात दुकानदारांनी नागरिकांना घरपोच सेवा द्यावी. जिल्ह्याबाहेर जावून लगेच परत येणाऱ्यांसाठी ई-पास सक्तीचा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका या कोरोना सर्वेक्षणाचे उत्तम प्रकारे करत आहेत. हे काम करण्यासाठी त्यांना मास्क, हॅंडग्लोज या गोष्टींबरोबर पावसाळी भाग असणाऱ्या कोयना विभागात छत्र्यासुध्दा देण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी गटविकास अधिकारी मीना साळुंखे व सभापती राजाभाऊ शेलार यांना केल्या. तर पाटण पंचायत समितीने यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याची माहिती सभापती राजाभाऊ शेलार यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, तासाभरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

RSS आणि बाबरी मस्जिद प्रकरणाचा अखेर उलगडा होणार, संजय दत्त समोर आणणार इतिहासाचा ‘आखरी सवाल’

SCROLL FOR NEXT