patan 
सातारा

पणन राज्यमंत्र्यांची सूचना ः शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करा

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) ः राज्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पणन संचालनालयाच्या संलग्न संस्थांचे कार्य पोचविणे आवश्‍यक आहे. शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा व आदर्श बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे काम कृषी पणन संचालनालयाने करावे, अशा सूचना पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. 

गुलटेकडी-पुणे येथील कृषी पणन मंडळाच्या कार्यालयात कृषी पणन संचालनालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंत्री देसाईंच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करून देसाई म्हणाले, ""शासनाच्या पणन संचालनालयाची निर्मितीमागील उद्देशाप्रमाणे कामकाज व्हावे. शेतमालावर घेण्यात येणाऱ्या अडत, हमाली, तोलाईबाबत जे धोरण ठरविण्यात आले आहे त्या धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज चालते का हेही पाहणे तितकेच गरजेचे आहे. शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा व आदर्श बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी थेट पणनधारकांना परवाने देण्याची तरतूद आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा व आदर्श बाजारपेठ उपलब्ध करून द्याव्यात.'' 

कापूस खरेदीचाही घेतला आढावा 
कोरोना संक्रमनानंतर शासनाने केलेल्या लॉकडाउन काळात शेतकऱ्यांना कापूस विक्री करता आली नाही. शेतकऱ्यांकडे बराच कापूस शिल्लक असल्याने कापूस विक्रीस मान्यता देण्याची मागणी कृषी विभागाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. शासनाने परवानगी दिल्यानंतर किती क्विंटल कापसाची खरेदी झाली याचीही माहिती मंत्री देसाई यांनी बैठकीत घेतली. 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT