सातारा

बैठकीतच उदयनराजे म्हणाले ज्या ठिकाणी अडचण आहे, तेथे मला सांगा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा पालिकेच्या कारभारात गतिमानता आणा. लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत येऊ नयेत, यासाठी सर्वांनी पालिकेच्या कारभारात लक्ष घालावे. सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. कोरोना काळात पालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून तो मंजूर करून घेण्याचा पाठपुरावा करा, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या.
 
जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा पालिकेतील सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची आढावा बैठक घेतली. सुरक्षित अंतर राखून झालेल्या या बैठकीस नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे, पक्ष प्रतोद निशांत पाटील, दत्ता बनकर, सभागृह नेत्या स्मिता घोडके, तसेच सातारा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
 
सातारा पालिकेने हाती घेतलेल्या काही प्रकल्पाची कामे अपूर्ण आहेत. याविषयी उदयनराजेंनी नगरसेवकांना विचारणा केली. एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा अभियानातून लक्ष्मी टेकडी येथे उभारण्यात आलेल्या घरकुल योजनेचे काम अपूर्ण आहे. लोक तेथे राहण्यासाठी जात नाहीत. तेथील पथदिवे, सेफ्टी दरवाजे, पाण्याची टाकी, तसेच इतर कामे तातडीने ठेकेदार बीव्हीजी कंपनीकडून पूर्ण करून घ्यावीत, अशी सूचना त्यांनी केली, तसेच करंजे येथे प्राधिकरणाची नवीन पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या जागेचा प्रश्‍न सुटला का? अशी विचारणाही त्यांनी केली. उपाध्यक्ष किशोर शिंदेंनी खासगी व शाळेच्या जागेचा वाद असून, तो मिटविणे गरजेचे असल्याचे सांगितले. रस्त्याच्या कामांची टेंडर निघालेली आहेत. ही कामे दर्जेदार होण्यासाठी अधिकारी व ठेकेदारांत समन्वय ठेवावा, अशी सूचनाही उदयनराजेंनी केली.

पालिकेची दहा तारखेला सर्वसाधारण सभा होणार आहे. सुरक्षित अंतर राखून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्याचे नियोजन करा. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी माफ होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत येऊ नयेत, याची काळजी घ्यावी. अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर तातडीने भर द्यावा. ज्या ठिकाणी अडचण आहे, तेथे मला सांगा, असेही त्यांनी पदाधिकारी व नगरसेवकांना सांगितले.

सातारा : आठ तालुके, 48 बाधित : वाचा तुमच्या परिसरातील किती रुग्ण?
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT