Satara ST News  Sakal
सातारा

Satara ST News : एसटीच्या फेऱ्या रद्द... प्रवाशांची पायपीट

चालकांअभावी गाड्या आगारातच; ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांची गैरसोय

हेमंत पवार

कऱ्हाड : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी आगाराला चालकांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे उपलब्ध चालकांवर एसटीचा भार पडत असून, त्यामुळे एसटी आगाराला अनेक गावच्या फेऱ्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार व विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना इतर दळणवळणाचे साधनच नसल्यामुळे दररोज चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

विद्यार्थ्यांना दुहेरी आर्थिक भुर्दंड

विद्यार्थ्यांनी एसटीकडून सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून दिले जातात. त्यासाठी विद्यार्थी अगोदर एक किंवा तीन महिन्याचे पैसे भरतात. त्यानंतर त्यांना पास दिला जातो. सध्या शाळा महाविद्यालये बंद असली, तरी क्लाससह अन्य अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

एसटीचा पास असूनही त्यांना दररोज सकाळी ग्रामीण भागातून सुमारे चार ते पाच किलोमीटर चालत मुख्य मार्गावर यावे लागते. तेथे वाट पाहात थांबून बस मिळाल्यावर संबंधित ठिकाणी पोचावे लागत आहे. या कटकटीला वैतागून काही विद्यार्थी हे खासगी वाहनाने प्रवास करून जात आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना दुहेही आर्थिक भुर्दंड बसत आहे.

प्रवाशांच्या तुलनेत एसटी बस तोकड्या

सध्या प्रवाशांच्या संख्या हजारात आणि एसटी बसची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अशी स्थिती आहे. एसटीने खासगी वाहनांनी जाणारे प्रवासी महामंडळाच्या बसकडे वळविण्यासाठी अनेक उपक्रम राबवून प्रयत्न केले. त्याद्वारे त्यांना चांगले यशही मिळून प्रवासी संख्याही वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीसाठी बसची संख्या वाढविलेली नाही.

एसटीकडून रद्द करण्यात आलेल्या बसफेऱ्या...

  • कऱ्हाड- तांबवे

  • कऱ्हाड- डेळेवाडी

  • कऱ्हाड- मसूर

  • कऱ्हाड- काले

  • कऱ्हाड- शेडगेवाडी

  • कऱ्हाड- विटा

  • कऱ्हाड- पुणे

  • कऱ्हाड- सातारा

  • कऱ्हाड- कोल्हापूर

  • कऱ्हाड- सांगली

सवलतीमुळे प्रवाशांची गर्दी

एसटी महामंडळाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ६५ वर्षांवरील सर्वांना अर्ध्या तिकिटात प्रवास, अपंग व अन्य प्रवाशांना एकचतुर्थ्यांश सवलत, विद्यार्थी-विद्यार्थिनींना सवलतीचे पास, महिलांना अर्धे तिकीट आदींसह अन्य प्रवास सवलती दिल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा सध्या वाट पाहीन; पण एसटीनेच जाईन हे ठेका सुरू झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढून एसटीच्या उत्पन्नातही भर पडली आहे.

कऱ्हाड आगाराकडे ३३ चालकांची पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर दररोज आजारपणासह अन्य काही कारणामुळे सात ते आठ चालक गैरहजर असतात. त्यामुळे उपलब्ध चालकांची बेरीज करून प्रवासी वाहतुकीच्या एसटीच्या फेऱ्या चालवाव्या लागतात. चालकांअभावी काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

- विक्रम हांडे, आगार व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT